TRENDING:

नाशिकमधील 5 बेस्ट धबधबे, कुटुंबासह जाऊन घेऊ शकता आनंद, नयनरम्य असं दृश्य, PHOTOS

Last Updated:
नाशिक शहर हे निसर्गरम्य आणि हिरवेगार असे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे तसेच गडकिल्ले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या आजूबाजूला अनेक धबधबे आहेत, ज्याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद घेऊ शकतात. हे 5 धबधबे कोणते आहेत, ते जाणून घेऊयात. (कुणाल दंडगव्हाळ/नाशिक, प्रतिनिधी)
advertisement
1/5
नाशिकमधील 5 बेस्ट धबधबे, कुटुंबासह जाऊन घेऊ शकता आनंद, नयनरम्य असं दृश्य, PHOTOS
पैना वॉटरफॉल - हा धबधबा नाशिक शहरापासून 30 किमी अंतरावर त्र्यंबक आणि घोटी या महामार्गावर आहे. हा धबधबा दूरहून एखाद्या नेकलेसप्रमाणे दिसतो. त्यामुळे याला नेकलेस वॉटरफॉलही सोशल मीडियावर नाव ठेवण्यात आले आहे.
advertisement
2/5
दुगरवाडी धबधबा - हा महाराष्ट्रातील सर्वोत्तम नैर्सर्गिक धबधबा म्हणून ओळखला जातो. हा धबधबा नाशिक येथून फक्त 30 किमी अंतरावर तर जवाहर येथून फक्त 2 किमी अंतरावर आहे. दुगारवाळी हा धबधबा अनेक लोकांना माहिती नसल्याने या ठिकाणी अतिशय स्वच्छ आणि सुंदर असे ठिकाण आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या परिवारासोबत वेळ घालवू शकतात.
advertisement
3/5
बाहुली धबधबा - हा एक उत्तम असा आपल्या परिवारासोबत फिरण्यासाठी आणि पिकनिक करण्यासाठी योग्य असा स्पॉट आहे. या ठिकाणी अनेक रिसॉर्टदेखील आहे. बाहुली धारणाजवळ हा धबधबा वाहत असतो. हा धबधबा नाशिकपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या भावली डॅम परिसरात आहे. याबाबतची माहिती गुगलवर सहज उपलब्ध आहे. नाशिक इगतपुरी ठिकाणाहून समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा धबधबा आहे.
advertisement
4/5
अशोक धबधबा - हा धबधबा कसारा-विहिगाव-जवाहर या रस्त्याने येतो. नाशिक येथून 30 किमी अंतरावर आणि जवाहर रोडपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे. कसारा रस्त्यावरील मानस रिसॉर्ट या ठिकाणाहून हा धबधबा सहज आपल्याला बघण्यास मिळत असतो. तसेच घटनदेवी मंदिराकडे जाताना देखील हा धबधबा दिसतो.
advertisement
5/5
इगतपुरी येथील कॅमल व्हॅली. पावसाळ्यात हे ठिकाण 2 डोंगरांच्या मध्ये हिरवागार अशा स्वरुपात पाहण्यास मिळते. त्यामधून वाहणारे पाणी सर्वांना मोहित करते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसते. कॅमल व्हॅली ही मुंबई-नाशिक या महामार्गावरून नाशिककडे येताना लागणाऱ्या फॉग सिटी या परिसरातून पाहायला मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमधील 5 बेस्ट धबधबे, कुटुंबासह जाऊन घेऊ शकता आनंद, नयनरम्य असं दृश्य, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल