TRENDING:

BOM Recruitment 2026: 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 600 पदांची मेगाभरती! पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Last Updated:
जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदाच्या माध्यमातून भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये भरतीच्या माध्यमातून 600 पदे भरली जाणार आहेत.
advertisement
1/6
'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 600 पदांची मेगाभरती! पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये भरतीच्या माध्यमातून 600 पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
advertisement
2/6
अप्रेंटिसशिप म्हणजे एम्प्लॉईला प्रत्यक्ष कामाच्या आधारे प्रशिक्षण दिले जाते. या काळात उमेदवारांना बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. बँकेतील दैनंदिन कामकाज कसे चालते याचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाते.
advertisement
3/6
अप्रेंटिसशिप साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष कालावधीसाठी असते. या काळात मिळणारा अनुभव पुढील नोकरीसाठी फायदेशीर ठरतो. अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना इतर बँका किंवा संस्थांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
advertisement
4/6
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2026 आहे. या भरतीसाठी 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे.
advertisement
5/6
अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला स्थानिक भाषा येणे गरजेचे आहे. उमेदवाराने 10 वी आणि 12 वीचे शिक्षण स्थानिक भाषेतून पूर्ण केलेले असावे आणि त्याची मार्कशीट उपलब्ध असावी.
advertisement
6/6
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तेथे नवीन रजिस्ट्रेशन करा आणि नंतर लॉग इन करा. त्यानंतर अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याचा प्रिंटआउट काढून ठेवणे विसरू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
BOM Recruitment 2026: 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 600 पदांची मेगाभरती! पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल