Weather Update: हाडं गोठवणारी थंडी वाढणार, उत्तरेकडून मोठं संकट, महाराष्ट्राच्या तापमानावर काय होणार परिणाम?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तर भारतात पंजाबपासून बिहारपर्यंत ऑरेंज अलर्ट, हिमालयात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात नागपूर, गोंदिया, नाशिकमध्ये तापमानात घट, २ जानेवारीपर्यंत गारठा.
advertisement
1/6

नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. उत्तर भारतात सध्या दाट धुक्याचे साम्राज्य असून पंजाबपासून बिहारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बदलत्या हवामानाचे पडसाद आता महाराष्ट्रात, प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उमटणार आहेत.
advertisement
2/6
गेल्या २४ तासांत जम्मू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता ५० मीटरपेक्षाही कमी नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबरपासून हिमालयामध्ये एक नवीन 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' सक्रिय होत आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढणार असून, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तर भागात कोल्ड वेवचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/6
महाराष्ट्र जरी थेट या शीतलहरीच्या कक्षेत नसला, तरी लगतच्या राज्यांमधील (मध्य प्रदेश आणि छत्तीसगड) तापमानातील घसरणीचा परिणाम राज्यावर होणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र: नागपूर, गोंदिया आणि नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होऊन हुडहुडी वाढणार आहे.
advertisement
4/6
सध्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानात मोठा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. विमान आणि रेल्वे प्रवाशांना फटका बसला आहे. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी जे पर्यटक उत्तर भारतात जाणार आहेत, त्यांना या धुक्याचा मोठा फटका बसू शकतो.
advertisement
5/6
2 जानेवारीपर्यंत गारठा कायम राहणार आहे. कमाल तापमानात किंचित अशी वाढ झाली असी तरी परभणी, धुळे, अहिल्यानगर आणि निफाड या भागांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे. हाडं गोठवणारी थंडी असल्याने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
6/6
राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळत असला तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी कायम राहणार आहे. जानेवारी महिन्यात देखील हीच परिस्थिती असेल. नव्या वर्षाची सुरुवात देखील दाट धुके आणि गारठ्याने होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: हाडं गोठवणारी थंडी वाढणार, उत्तरेकडून मोठं संकट, महाराष्ट्राच्या तापमानावर काय होणार परिणाम?