पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर पुन्हा वाहतूक कोंडी, लांबच लांब वाहनांच्या रांगा, धडकी भरवणारे Photo
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुण्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक थांबवल्याने मुंबई लेनवर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
advertisement
1/5

पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग अर्थात एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शिवजयंती निमित्ताने सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आहेत.
advertisement
2/5
खंडाळा घाटात वाहतूक संथ गतीने सुरू असून मुंबई कडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहने वाढल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांकडून 15-15 मिनिटांचे ब्लॉक घेण्यात येत आहेत.
advertisement
3/5
त्यामुळे पुण्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक थांबवल्याने मुंबई लेनवर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
advertisement
4/5
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर सतत होणाऱ्या या वाहतूक कोंडी मुळे आता वाहनचालक आणि पर्यटक मात्र वैतागले आहेत.
advertisement
5/5
गेल्याच आठवड्यात सुमारे ३५ तासांची वाहतूक कोंडी पुणे-मुंबईकरांनी सहन केली होती. एक टँकर घाटाच्या लगत बंद पडल्याने सुमारे ५० किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर पुन्हा वाहतूक कोंडी, लांबच लांब वाहनांच्या रांगा, धडकी भरवणारे Photo