TRENDING:

गूगलने भारतात लॉन्च केला पिक्सेल 10A, किंमत 49,999; पाहा कधी सुरु होतेय विक्री

Last Updated:
गूगलने भारतात आपला नवीन स्मार्टफोन पिक्सेल 10A लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा फोकस या फोनच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फीचर्सला जास्तीत जास्त यूझर्सपर्यंत पोहोचवणे आहे.
advertisement
1/9
गूगलने भारतात लॉन्च केला पिक्सेल 10A, किंमत 49,999; पाहा कधी सुरु होतेय विक्री
नवी दिल्ली : गुगलने भारतात फिक्सेल 10A स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा हेतू या फोनच्या माध्यमातून आपल्या अडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फीचर्सला मिड रेंज यूझर्सपर्यंत पोहोचवणे आहे. जेणेकरुन जास्त लोक गूगलच्या एआय टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊ शकतील.
advertisement
2/9
पिक्सल 10A चा सेल 6 मार्च 2026 पासून सुरु होईल. मात्र प्री ऑर्डर आजपासून सुरु आहे. गूगल इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मितुल शाह यांनी म्हटले की, पिक्सल 10ए कमी किंमतीत प्रीमियम फीचर्सचा दमदार पॅकेज आहे आणि याला विशेषतः भारतीय यूझर्सच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. कंपनीला आशा आहे की, हा फोन भारतात पिक्सेल ब्रांडची उपलब्धता आणखी मजबूत करेल.
advertisement
3/9
पिक्सेल 10ए मध्ये डिस्प्ले, बॅटरी आणि एआय फीचर्ससह अनेक प्रमुख अपग्रेड्स आहेत. हा फोन दैनंदिन वापरासाठी आणि उच्च कामगिरीसाठी डिझाइन केला आहे. यात 6.3-इंचाचा डिस्प्ले आहे ज्याची ब्राइटनेस 3,000 निट्स पर्यंत आहे. याचा अर्थ असा की स्क्रीन तेजस्वी सूर्यप्रकाशातही स्पष्ट आणि चमकदार दिसेल. गुगलचा दावा आहे की ही आतापर्यंतची सर्वात तेजस्वी पिक्सेल ए सीरीज स्क्रीन आहे.
advertisement
4/9
दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग : पिक्सेल 10ए मध्ये 5,100 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्याव 30 तासांहून जास्त चालू शकते. यामध्ये 30 वॉटची फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. जेणेकरुन यूझर्सला वारंवार चार्जिंगची चिंता करावी लागू नये.
advertisement
5/9
एआय कॅमेरा फीचर्स : गूगलने या फोनमध्ये अनेक नवीन एआय कॅमेरा फिचर्स दिले आहेत. जसे की कॅमेरा कोच आणि ऑटो बेस्ट टेक. तुम्ही ग्रुप फोटो काढला तर फोन स्वतःच सर्वात चांगला फोटो निवडेल ज्यामध्ये सर्व लोकांचा चेहरा दिसतोय. यामुळे खराब फोटोची समस्या संपते.
advertisement
6/9
मजबूती आणि दीर्घ सॉफ्टवेअर सपोर्ट : पिक्सेल 10ए हा आयपी68 रेटिंगचा आहे, ज्यामुळे तो पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनतो. गुगलने असेही आश्वासन दिले आहे की या फोनला सात वर्षांसाठी सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स मिळतील, जे या विभागातील एक महत्त्वपूर्ण यश आहे.
advertisement
7/9
डिझाइन आणि कलर ऑप्शन : हा फोन चार रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे: लॅव्हेंडर, ऑब्सिडियन, फॉग आणि बेरी. गुगलने डिझाइनला प्रीमियम टच देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे तो एका उच्च दर्जाच्या फ्लॅगशिप फोनसारखा वाटतो.
advertisement
8/9
लॉन्च ऑफर्स आणि सोपे हप्ते : गूगलने पिक्सेल 10A वर अनेक ऑफर्स दिल्या आहेत. जेणेकरुन ग्राहक हे सहज खरेदी करु शकतील. एचडीएफसी बँक कार्डवर 3,000 रुपयांची सूट मिळेल. जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त बोनस दिलं जाईल. ग्राहक 24 महिन्यापर्यंत कोणत्याही व्याजाशिवाय ईएमआयचा पर्यायही निवडू शकतात. याव्यतिरिक्त गूगल पिक्सेल अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत 2,083 रुपये महिन्याच्या हप्त्यावर फोन खरेदी केला जाऊ शकतो.
advertisement
9/9
पिक्सेल अपग्रेड प्रोग्राम म्हणजे काय? : गुगलच्या अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत, ग्राहक नऊ महिन्यांचे हप्ते भरल्यानंतर त्यांचा जुना पिक्सेल फोन नवीन मॉडेलसाठी परत करू शकतात. यामुळे संपूर्ण रक्कम एकाच वेळी खर्च न करता दरवर्षी नवीन पिक्सेल फोनमध्ये अपग्रेड करणे सोपे होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
गूगलने भारतात लॉन्च केला पिक्सेल 10A, किंमत 49,999; पाहा कधी सुरु होतेय विक्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल