TRENDING:

गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी 'हुशारी', दत्ता गाडे शातीर निघाला, बायको पोरं असतानाही पोलिसांना म्हणतो...

Last Updated:
Datta Gade Police Interrogation : दत्ता गाडेच्या रक्ताचे आणि केसांचे नमुने पुणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून प्रमुख बाबी स्पष्ट होणार आहेत. पुणे पोलिसांना आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे.
advertisement
1/7
दत्ता गाडे शातीर निघाला, बायको पोरं असतानाही पोलिसांना म्हणतो...
परगावी जाणाऱ्या एका युवतीवर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात तेथीलच एका बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. दत्ता गाडे या मूळच्या शिरूरच्या आरोपीने हे क्रूर कृत्य केले.
advertisement
2/7
गुन्हा घडल्यानंतर जवळपास ४८ तासांनंतर पोलिसांनी त्याला गुणाट गावातूनच अटक केली. तब्बल दीड ते दोन दिवस दत्ता ऊसाच्या शेतात लपून बसला होता. त्याच्या शोधासाठी त्तबल १०० पोलीस गुणाट गावात दाखल झाले होते. गुरुवारी मध्यरात्री त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. १३ मार्चपर्यंत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
3/7
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची लैंगिक क्षमता चाचणी ससून रुग्णालयात केली. दत्ताच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
advertisement
4/7
पोलीस कोठडीत असलेल्या दत्ताचे जबाब पोलीस नोंदवून घेत आहेत. त्याचे रक्त आणि केस डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
advertisement
5/7
दुसरीकडे गुन्ह्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी दत्ताने नवं नाटक रचलं आहे. त्यामुळे बलात्कर प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
6/7
दत्ताच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा करून या प्रकरणाला वेगळेच वळण दिले असताना दत्ताने समलैंगिक असल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस चौकशीत दत्ताने आपण तृतीयपंथी असल्याचे सांगत त्यामुळेच मी सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे मागत असल्याचे सांगितले.
advertisement
7/7
दत्ताच्या नव्या दाव्याने पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. आरोपीला आपला बचाव कसा करायचा, याची चांगलीच माहिती असून तो हुशारीने आपले जबाब देत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र त्याच्याविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले असून डीएनए चाचणीतून बऱ्याच प्रमुख बाबींचा खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी 'हुशारी', दत्ता गाडे शातीर निघाला, बायको पोरं असतानाही पोलिसांना म्हणतो...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल