पहिल्या महायुद्धात सांडलं होतं सातारकरांचं रक्त, 278 वीरांचं हे स्मारक देतंय साक्ष
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
साताऱ्यात 14 गुंठे जागेत शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात येतेय. या उद्यानात स्मृतिस्तंभ तसेच गोलाकार भिंतीवर 278 हुतात्मा जवानांच्या नावाची कोनशीला बसविण्यात आली आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">सातारा जिल्हा</a> हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत अनेक वीरांनी हौतात्म्य पत्करलं. याच शहिदांच्या स्मृतीचं अनोखं स्मारक साताऱ्यात उभारण्यात आलंय.
advertisement
2/7
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात आलीय. सातारा जिल्ह्यातील ज्या सैनिकांनी देशसेवा करताना हौतात्म्य पत्करलं त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हे स्मृती उद्यान उभारल्याचं सांगण्यात येतंय.
advertisement
3/7
दिल्लीतील इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरिअल स्मारकाच्या धर्तीवर साताऱ्यात स्मृती उद्यान उभारलं जातंय. 14 गुंठे जागेत शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात येतेय.
advertisement
4/7
पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत विविध युद्धांत शहीद झालेले जवान, त्यांचे नाव, कोणत्या युद्धात शहीद झाले? आणि शहीद झालेली तारीख अशी 278 जवानांची माहिती स्मारकात लावण्यात आलीय.
advertisement
5/7
या उद्यानात स्मृतिस्तंभ तसेच गोलाकार भिंतीवर 278 हुतात्मा जवानांच्या नावाची कोनशीला बसविण्यात आली आहे. कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 17 नोव्हेंबर 2015 मध्ये साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते 41 राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते.
advertisement
6/7
पहिले महायुद्ध, भारत- पाक युद्ध, भारत-चीन युद्ध, कारगिल युद्ध यांसारख्या अनेक युद्धात 278 पेक्षा जास्त सैनिक शहीद झाले आहेत. या शहीद जवानांची माहिती ग्रॅनाईटमध्ये कोरून स्मृती उद्यानात दिली आहे. तसेच शहीद जवानांची छायाचित्रे फायबर मिररच्या माध्यमातून लावण्यात आली आहेत.
advertisement
7/7
शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानात आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींचं जतन करण्यात आलंय. तसेच यानंतर जिल्ह्यातील शहीद जवानांचं पार्थिव या स्मृती उद्यानात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच हे उद्यान लवकरच सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याचेही सांगितले. (शुभम बोकडे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
पहिल्या महायुद्धात सांडलं होतं सातारकरांचं रक्त, 278 वीरांचं हे स्मारक देतंय साक्ष