महाबळेश्वर, पाचगणीचे पावसाळ्यातील नयनरम्य दृश्य, पर्यटकांची मोठी गर्दी, मोहित करणारे फोटो समोर!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा जिल्हा विविधतेने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणार महाबळेश्वर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगळच अनुभूत असं रूप पाहायला मिळतं. या निमित्ताने इथे येणाऱ्या पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते. (शुभम बोडके/सातारा, प्रतिनिधी)
advertisement
1/8

नुकताच पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी येथील परिसर हा संपूर्ण धुक्याच्या चादरमध्ये लपला जातो. आज आपण अशीच काहीतरी विहंगमय दृश्य पाहणार आहोत.
advertisement
2/8
पावसाची उघडीत मिळाल्यास तिथलं निसर्ग सौंदर्य एक अद्भुत पाहायला मिळते. उंच उंच डोंगरांवरून दऱ्या- खोऱ्यांमध्ये नजर फिरवल्यास आपल्याला ढग जमिनीवर उतरल्याचे अनुभूती होते.
advertisement
3/8
हे बघत असताना पर्यटक त्याचबरोबर नागरिक यांना स्वर्गात आल्याच्या अनुभूती झाल्याचे पाहिले मिळते.
advertisement
4/8
विविधतेने नटलेल्या या पाचगणी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना आपण महाराष्ट्रात नसून विदेशात आल्याचे अनुभूती देखील होते.
advertisement
5/8
आता सर्वत्र पावसाची हिरवळ आणि ओलेचिंब रस्ते पाहायला मिळत आहे. या थंडगार वातावरणात बाहेरच्या निसर्गाचा अनुभव घेणे म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच होय.
advertisement
6/8
पावसाला सुरुवात होताच आपले बाहेर फिरण्याचे प्लॉन सुरु होतात. नेहमी तिच पावसाळी ठिकाणे फिरून तुम्हालाही आता कंटाळा आला असेल तर मग या सुट्टीत तुम्ही महाराष्ट्रातील एक अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता आणि आपल्या मित्रपरिवारासोबत महाबळेश्वर, पाचगणीला भेट देऊ शकतात.
advertisement
7/8
महाबळेश्वर, पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगरांनी वेढलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हिरव्यागार निसर्गाचा अनुभव येथे घेता येतो. ट्रेकिंग आणि मनमुराद निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
advertisement
8/8
पाचगणीला वास्तुकला आणि इतिहासाचे आकर्षण आहे. तर महाबळेश्वरला वेगवेगळ्या पॉईंट उंच डोंगर दर्या धबधबे आहेत .महाबळेश्वर पाचगणीतील 'या' निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
महाबळेश्वर, पाचगणीचे पावसाळ्यातील नयनरम्य दृश्य, पर्यटकांची मोठी गर्दी, मोहित करणारे फोटो समोर!