घराचं छत उडालं, उभी पिकं आडवी झाली; सोलापुरात आभाळ फाटलं, गारपिटीनं सारं हिरावलं, PHOTOS
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Rain: हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या या गारपीट आणि वादळी पावसामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
1/7

मध्य महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी संकट घोंघावत आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अलर्ट कायम आहे. जिल्ह्यातील काही भागात बुधवारी वादळी पाऊस आणि गारपिटीने कहर केला.
advertisement
2/7
मोहोळ तालुक्यात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या पावसासोबत गारपीटही झाल्याने केळी, द्राक्ष, शेवगा, डाळिंब आणि कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे.
advertisement
3/7
बुधवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यात ताशी 40-50 किमीपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत होते. तसेच यामध्ये गारपीट आणि पाऊस सुरू होता. त्यामुळे झाडे उन्मळून पडली. तर शेती पिके देखील आडवी झाली आहेत. विशेषतः काढणीस असलेल्या द्राक्षबागांना या पावसाचा मोठा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
advertisement
4/7
मोहोळ तालुक्यासह खंडाळी, पापरी, पोफळी, कामती, पेनूर, देवडी आणि पाटकूल परिसरात या अवकाळी पावसाचा जोर अधिक होता. खंडाळी व आसपासच्या भागातील द्राक्षबागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत.
advertisement
5/7
पापरी गावात शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष आणि केळीच्या बागा भुईसपाट झाल्याचे चित्र आहे. तसेच डाळिंब, कांदा, शेवगा आणि इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. काही घरांवरील छत उडून गेल्याने आणि कोसळल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
6/7
अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या या पावसामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
घराचं छत उडालं, उभी पिकं आडवी झाली; सोलापुरात आभाळ फाटलं, गारपिटीनं सारं हिरावलं, PHOTOS