TRENDING:

आई-वडिलांच्या कष्टाचं चीज, ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला पोलीस अधिकारी, गावात जंगी स्वागत, PHOTOS

Last Updated:
(सुरेश जाधव, प्रतिनिधी) : जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर माणूस परिस्थितीवर मात करून काहीही करून दाखवू शकतो. अतिशय गरिबीतून शिक्षण पूर्ण करून अधिकारी झालेल्या मुलांचा प्रेरणादायी प्रवास तुम्ही अनेकदा ऐकला किंवा वाचला असेल.
advertisement
1/6
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज, ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला पोलीस अधिकारी, PHOTOS
बीडमधील एका तरुणाचा असाच प्रेरणादायी प्रवास आता समोर आला आहे. परिस्थितीवर मात करत हार न मानता या तरुणाने मोठं यश मिळवलं. आज फक्त आई-वडीलच नाही तर गावातील लोकांनाही त्याचा अभिमान वाटतोय. जाणून घेऊया या तरुणाविषयी
advertisement
2/6
ऊसतोड कामगाराचा मुलगा डीवायएसपी झाला आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलानं मिळवलेल्या या यशामुळे त्याची गावात ग्रामस्थांच्या वतीने जंगी मिरवणूक काढण्यात आली.
advertisement
3/6
बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावातील ऊसतोड मजूर राम लाड यांनी ऊस तोडणी करून मुलाला शिकवलं. त्या कष्टाचे चीज करत नागनाथ राम लाड याने एमपीएससी परीक्षा देत त्यात यश मिळवलं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.
advertisement
4/6
पोलीस अधिकारी होत त्यांनी वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. यामुळे गावकऱ्यांनी नागनाथ यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचं अनोखं स्वागत केलं आहे. गावात या तरुणाचे पोस्टर लावत त्याचं अभिनंदन करण्यात आलं आहे.
advertisement
5/6
तरुणाने एमपीएससीमध्ये 42 वी रँक मिळवत यशाचं शिखर गाठलं आहे. आई-वडिलांनी कष्ट करून शिकवलं. मुलाच्या शिक्षणासाठी आणि घर चालवण्यासाठी ऊसतोडीचं काम केलं. आता मुलानेही आई वडिलांच्या या कष्टाचं पांग फेडत मोठं यश मिळवलं आहे.
advertisement
6/6
पोलीस अधिकारी होताच गावातील लोकांनी तरुणाचं जंगी स्वागत केलं. त्याला खांद्यावर उचलून घेत त्याची मिरवणूक काढण्यात आली. गळ्यात फुलांचा हार आणि गुलाल उधळत गावकरी त्याच्या आनंदात सहभागी झाले. यावेळी महिलांनीही औक्षण करत नागनाथचं स्वागत केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज, ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला पोलीस अधिकारी, गावात जंगी स्वागत, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल