Walmik Karad Car: धनंजय मुंडेंनी पुजा केलेली अन् योगायोगाने वाल्मिकने लिफ्ट मागितलेली Scorpio जप्त
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वाल्मिक ज्या गाडीने सीआयडी कार्यालयात लिफ्ट मागून आला त्या गाडीची पुजा धनंजय मुंडेंनी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
advertisement
1/10

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने सरेंडर होताना वापरलेली गाडी केज पोलिसांनी जप्त केली आहे.
advertisement
2/10
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी पुण्याच्या पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता.
advertisement
3/10
सीआयडीला शरण येताना वाल्मिक कराड शिवलिंग मोराळेचे गाडी वापरली होती.
advertisement
4/10
शिवलिंग मोराळेच्या पत्नीच्या नावावर असलेल्या MH 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाल्मिक आला होता.
advertisement
5/10
तपास यंत्रणांनी देखील कोर्टात दावा केला की, हीच गाडी वाल्मीक कराड यांनी फरार होताना वापरली आहे.
advertisement
6/10
त्यामुळे तपास करण्यासाठी स्कार्पिओ गाडी जप्त करुन केज पोलीस ठाण्यात कव्हर टाकून झाकून ठेवण्यात आली आहे.
advertisement
7/10
उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी मस्साजोगला आले होते त्यावेळी ही गाडी त्यांच्या ताफ्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
8/10
वाल्मिक कराड ज्यावेळी सीआयडी कार्यालयात आला तेव्हा त्याने हीच गाडी वापरली होती.
advertisement
9/10
योगायोगाने गाडीचा मालक शिवलिंग मोराळेला वाल्मिकने लिफ्ट मागितली आणि सीआयडी कार्यालयात हजर झाला.
advertisement
10/10
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही गाडी ज्या वेळी मोराळेनी विकत घेतली त्यावेळी या गाडीची पुजा धनंजय मुंडेंनी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Walmik Karad Car: धनंजय मुंडेंनी पुजा केलेली अन् योगायोगाने वाल्मिकने लिफ्ट मागितलेली Scorpio जप्त