Wardha Bus Accident : वर्ध्यात एसटी बसचा भीषण अपघात! 40 प्रवासी जखमी; 5 जणांची प्रकृती चिंताजनक; PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Wardha Bus Accident : वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील तेलाई घाटात एसटी बस उलटल्याने मोठा अपघात घडला आहे. यात 40 प्रवासी जखमी झाले आहेत.
advertisement
1/5

वर्धा जिल्ह्यात एसटी बस उलटल्याने भीषण अपघात घडला असून या घटनेत 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/5
जिल्ह्याच्या आष्टीच्या तेलाई घाटात ही घटना घडली असून अपघातातील जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 40 जखमीपैकी पाच प्रवाश्यांची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
3/5
अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथून तळेगावला ही बस येत होती. दुचाकीला वाचविण्याच्या नादात बस उलटल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
advertisement
4/5
अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पाच रुग्णावाहिकांमध्ये जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
5/5
अपघात झालेली बस एक महिला चालक चालवत होती. (MH 40 Y 5103) या क्रमांकाची ही बस होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha Bus Accident : वर्ध्यात एसटी बसचा भीषण अपघात! 40 प्रवासी जखमी; 5 जणांची प्रकृती चिंताजनक; PHOTOS