TRENDING:

MBA तरुणानं मोठ्या ऑफर्स नाकारल्या; घरीच सुरू 'हे' केलं काम, उत्पन्न बक्कळ

Last Updated:
नोकरी की व्यवसाय, असा प्रश्न विचारला तर अनेकजण व्यवसाय म्हणतील. कारण त्यात स्वतःची सत्ता असते. परंतु व्यवसायात रिस्क असते हेही खरंय. स्वतःवर विश्वास असला आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर व्यवसायात यश मिळतंच यातही काही शंका नाही. असाच विचार करून एका एमबीए मोठमोठ्या कंपन्यांकडून मिळालेली नोकरीची ऑफर नाकारून स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
1/5
MBA तरुणानं मोठ्या ऑफर्स नाकारल्या; घरीच सुरू 'हे' केलं काम, उत्पन्न बक्कळ
आशिष शर्मा असं या तरुणाचं नाव. ज्यानं मोठमोठ्या पॅकेजेसच्या नोकऱ्या नाकारून गोसेवेत आपलं आयुष्य वेचलं. आशिष हा मध्यप्रदेशच्या शाजापूरचा रहिवासी.
advertisement
2/5
आशिषनं सांगितलं की, आमच्या 7 पिढ्यांनी गोसेवा केली आणि आता मीसुद्धा मागील 5 वर्षांपासून गायींची देखभाल करतोय. सध्या त्याच्याकडे 10 गायी आहेत.
advertisement
3/5
आशिष शर्माकडे गीर, साहिवाल, एचएफ अशा विविध प्रजातीच्या गायी आहेत. या गायीच्या दुधातून आशिषला महिन्याभरात 40 ते 50 हजार रुपये सहज मिळतात.
advertisement
4/5
आशिष सांगतो, सध्या गायींची अत्यंत दयनीय स्थिती आहे. त्या जोपर्यंत दूध देतात तोपर्यंत त्यांचे मालक त्यांची व्यवस्थित देखभाल करतात. परंतु गायीनं दूध देणं थांबवलं की मात्र तिला चाऱ्यासाठी इकडं-तिकडं भटकावं लागतं, जे अजिबात योग्य नाहीये.
advertisement
5/5
आशिष पुढे म्हणाला की, गोमातेची व्यवस्थित <a href="https://news18marathi.com/money/agriculture/kadaknath-chicken-egg-is-also-cheap-than-this-hen-1-egg-price-is-100-rupees-know-in-detail-mhkd-1196643.html">काळजी</a> घेतली तर तिचा आपल्याला <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/these-special-chutneys-will-make-your-meal-delicious-l18w-mhij-1196040.html">उपयोग</a>च होतो, ती कधीच आपल्याला ओझं वाटत नाही. उलट गोमाता आपल्याला आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/can-tomatoes-help-reduce-weight-mhij-1195902.html">भक्कम</a> करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
MBA तरुणानं मोठ्या ऑफर्स नाकारल्या; घरीच सुरू 'हे' केलं काम, उत्पन्न बक्कळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल