TRENDING:

साताऱ्यातील शेतकऱ्याने यशस्वी केला पॅशन फ्रुट शेतीचा प्रयोग, आता 3 लाखांहून अधिक कमाई

Last Updated:
सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील ऋषिकेश ढाणे हे आपल्या शेतीमध्ये पॅशन फ्रूट लागवड केली आहे. यामधून त्यांना वर्षाला 3 लाखांहून अधिक कमाई होत आहे.
advertisement
1/6
शेतकऱ्याने यशस्वी केला पॅशन फ्रुट शेतीचा प्रयोग, आता 3 लाखांहून अधिक कमाई
फळशेतीमध्ये चांगल्याप्रकारे अनुभव असलेल्या युवा प्रगतशील शेतकरी ऋषिकेश ढाणे यांनी प्रायोगिक तत्त्वावर आपल्या शेताच्या तार कंपाउंडवर, शेतातील झाडांवर पॅशन फ्रूट लागवड केली. त्यातून आत्मविश्‍वास मिळवत या नव्या फळशेतीचा विस्तार करत आपल्या शेतात अनेक वेगवेगळे फळांची लागवड देखील या युवा शेतकऱ्याने केली आहे. पॅशन फ्रुट शेतीमध्ये रुजवलेले हे फळ बाजारपेठेमध्येही रुजवण्याची ‘पॅशन’ या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आणि वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे. जाणून घेऊयात त्यांची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
2/6
सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील ऋषिकेश ढाणे हे आपल्या शेतीमध्ये अनेक वर्षांपासून पेरू, शेवगा, ड्रॅगन फूड आदी विविध फळ पिकांचे यशस्वी उत्पादन घेत होते. ऋषिकेश ढाणे हे पारंपरिक फळांचे यशस्वी उत्पादन घेत होते. मात्र, एकदा पॅशन फ्रूट शेतीबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी बाकी फळबाग लागवडच्या तुलनेपेक्षा हे सोपे आणि आपल्याकडे नवे असलेल्या या पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला.
advertisement
3/6
यानंतर त्यांनी आपल्या शेताच्या बांधांवर असलेल्या तार कंपाउंडवर पॅशन फ्रुट लावले. आतापर्यंत अनेक तोडे त्यांनी या पॅशन फ्रुटचे घेतले आहेत. पॅशन फ्रुट शेती, लागवड पद्धत आणि एकूणच व्यवस्थापन पाहिल्यानंतर आपणही शेती करू शकतो, असा विश्‍वास त्यांना वाटला. पॅशन फ्रुट याला कृष्ण फळही म्हणतात.
advertisement
4/6
फळामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी आणि सी मोठ्या प्रमाणात आढळते. आयर्न फॉस्फरसही आढळते. रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. पांढऱ्या पेशी ही कमी करण्यात मदत होते, असे अनेक फायदे या पॅशन फळाचे आहे. त्याचबरोबर चहालाही चांगला पर्याय म्हणून या फळाकडे पाहिले जातात. या फळापासून अनेक फायदेशीर आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जाणारा फळ म्हणूनही या फळाकडे पाहिले जातात.
advertisement
5/6
मार्केटमध्ये या फळाला 50 ते 60 रुपये किलो दर मिळतो. त्यामुळे आता युवा शेतकरी या फळाच्या लागवडीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मार्केटमध्ये वाढती मागणी आहे, त्याचबरोबर या फळापासून बाय प्रॉडक्ट तयार करुनही आपण याची विक्री करून कस्टमरला देऊ शकतो, असेही काही युवा उद्योजक एकत्र येऊन काम करत असल्याची माहिती ऋषिकेश ढाणे यांनी दिली.
advertisement
6/6
त्यामध्ये दोन प्रकारचे कलरचे फळ येत असते. एक रेड अनेक ऑरेंज प्रकारचे फळ पॅशन फ्रुट फळांमध्ये असते. ज्या कलरमध्ये पॅशन प्रो मार्केटमध्ये चालते, त्या फळाची लागवड करून एका एकरामध्ये तारेमध्ये कंपाउंड करून 2 ते 3 लाख रुपयांचे उत्पादन शेतकरी घेऊ शकतो, असेदेखील बोलताना त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
साताऱ्यातील शेतकऱ्याने यशस्वी केला पॅशन फ्रुट शेतीचा प्रयोग, आता 3 लाखांहून अधिक कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल