मिरची लागवड केली आणि बदललं शेतकऱ्याचं नशीब; आता लाखोंची कमाई PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
यवतमाळ मधील शेतकरी मनोज नंदूरकर यांना कापसामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळतं नव्हतं म्हणून मिरची लागवड केली. त्यांचा हा मिरची लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
1/6

यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध असून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत. मात्र, यवतमाळच्या करंजी येथील शेतकरी मनोज नंदूरकर यांना कापसामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळतं नव्हतं म्हणून मिरची लागवड केली. त्यांचा हा मिरची लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
2/6
यवतमाळच्या करंजी येथील शेतकरी मनोज नंदूरकर यांनी बरीच वर्षे फक्त कापूसाचे उत्पन्न शेतात घेतलं. मात्र पाहिजे तसा फायदा त्यांना या शेतीतून मिळत नव्हता.
advertisement
3/6
त्यामुळे त्यांनी मिरचीचं उत्पादन घेण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि 6 ते 7 वर्षांपूर्वी सुरुवातीला 1 एकर वर मिरची लागवड केली. सर्व खर्च काढून लाखोंचा नफा त्यांना मिळताना दिसला.
advertisement
4/6
त्यामुळे मिरचीचे क्षेत्र वाढून यावर्षी देखील त्यांनी 4 एकर वर मिरची लागवड केलीय. या वर्षी मिळणाऱ्या दरावर नफा अवलंबून असला तरी 1 ते दीड लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.
advertisement
5/6
मी बरीच वर्षे आपल्या शेतात कापूस लागवड करत होतो. मात्र काही वर्षे आधी कापूस उत्पादन करत असताना अनेक अडचणी अनुभवल्या. गुलाबी बोंडअळी आणि इतर रोगांमुळे कापूस नुकसानीत जायचा.
advertisement
6/6
शेत मालाला भावही मनासारखं नव्हते. त्यामुळे नफा समाधानकारक नव्हता. त्यामुळे मी मिरची पिकविण्याचा निर्णय घेतला. आणि गेल्या काही वर्षांपासून मला चांगला नफा मिळत आहे. यंदा मिळणाऱ्या भावावर नफा अवलंबून असला तरी अंदाजे दीड लाख एकरी नफा मिळेल, असं मनोज नंदूरकर यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
मिरची लागवड केली आणि बदललं शेतकऱ्याचं नशीब; आता लाखोंची कमाई PHOTOS