TRENDING:

'ATM मध्ये गेल्यावर 2 वेळा दाबा कॅन्सल बटण, नाही केलात तर.... ' काय सांगतं RBI? लगेच वाचा

Last Updated:
डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी ही एक ‘जादूची ट्रिक’ असल्याचं लोक सांगू लागले आहेत. हा दावा इतका पसरला की अनेकांनी तो खरा मानायला सुरुवातही केली.
advertisement
1/9
'ATM मध्ये गेल्यावर 2 वेळा दाबा कॅन्सल बटण, नाही केलात तर.... ' काय सांगतं RBI?
डिजिटल पेमेंट्सने आज देशभरात चालतो. अगदी लहान दुकान चालवणारे देखील हल्ली डिजिटल पेमेंटचा वापर करतात. त्यामुळे कॅश किंवा रोख रक्कमेचा व्यवहार लोकांमध्ये आता कमी होत आहे. पण असलं असलं तरी रोकडचा उपयोग पूर्णपणे कमी झालेला नाही. काही ठिकाणी आजही पैसे वापरले जातात. त्यामुळे पैसे काढण्यासाठी लोक ATM चा वापर करतात.
advertisement
2/9
ATM संबंधीत फेसबुक, वॉट्सअ‍ॅप आणि इतर प्लॅटफॉर्मवर असा मेसेज व्हायरल होत आहे की एटीएममध्ये पिन टाकण्याआधी जर आपण ‘कॅन्सल’ बटण दोनदा दाबले, तर तुमचा पिन चोरी होणार नाही आणि हॅकर्स पकडले जातील. डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी ही एक ‘जादूची ट्रिक’ असल्याचं लोक सांगू लागले आहेत. हा दावा इतका पसरला की अनेकांनी तो खरा मानायला सुरुवातही केली.
advertisement
3/9
सरकार आणि आरबीआयने काय सांगितले?हा व्हायरल मेसेज इतका पसरला की शेवटी सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक टीमने स्वतः त्याची पडताळणी केली. त्यांच्या फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट सांगितले गेले की “एटीएममध्ये दोनदा कॅन्सल बटण दाबल्याने हॅकिंग किंवा स्किमिंगपासून बचाव होतो हा दावा 100% खोटा आणि भ्रामक आहे.”
advertisement
4/9
आरबीआयनेही याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले:कॅन्सल बटणाचा उद्देश फक्त चुकीचा पर्याय रद्द करणे आणि व्यवहार थांबवणे हा आहे.याचा पिन सुरक्षा, स्किमिंग, हॅकिंग किंवा फसवणूक प्रतिबंधाशी काहीही संबंध नाही.केंद्रीय बँकेने अशा कोणत्याही ट्रिकची कधीच शिफारस केलेली नाही.त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे दावे पूर्णपणे खोटे ठरले आहेत.
advertisement
5/9
मग एटीएम फसवणूक होत नाही का?अनेक लोकांनी प्रश्न विचारला, जर हा दावा चुकीचा असेल तर एटीएममधील स्किमिंगची प्रकरणेही खोटी आहेत का?उत्तर आहे नाही! स्किमिंगची फसवणूक खरोखर घडते.चोर एटीएमच्या कार्ड स्लॉटवर स्किमिंग डिव्हाइस बसवतात, ज्यामुळे आपण कार्ड घातल्यावर त्याची माहिती त्यांना मिळते. काही ठिकाणी कीपॅडवर खोटे कव्हर बसवून पिन नंबरही चोरी केला जातो. यामुळे अनेकांचे पैसे गमावले जातात. म्हणून स्किमिंग ही वास्तविक समस्या असली तरी ‘कॅन्सल बटण ट्रिक’ हा पूर्णपणे अफवा आहे.
advertisement
6/9
एटीएम फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करावे? (खरी आणि सुरक्षित टिप्स)एटीएमचा कार्ड स्लॉट नीट पहासैल, हलत असलेला किंवा संशयास्पद डिव्हाइस दिसला तर त्या एटीएममध्ये कार्ड टाकू नका.
advertisement
7/9
कीपॅडवर बसवलेल्या कॅमेरा किंवा कव्हरमुळे पिन चोरी होऊ शकतो. त्यामुळे नंबर पॅडवर हात ठेवून पिन टाका. पिन दर 3–6 महिन्यांनी बदला आणि सोपे पिन जसे 1234, 0000, 1111 वगैरे वापरू नका. कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास ताबडतोब ब्लॉक करा. बँकेला कॉल करून कार्ड लगेच निष्क्रिय करा.
advertisement
8/9
कार्ड एटीएममध्ये अडकला तर अनोळखी लोकांकडून मदत मागू नका, अनोळखी व्यक्ती फसवणूक करणारी असू शकते. संशयास्पद वाटल्यास दुसऱ्या एटीएममध्ये व्यवहार करा आणि पहिल्या एटीएमची तक्रार बँकेत नोंदवा.
advertisement
9/9
एटीएममध्ये ‘कॅन्सल’ बटण दोनदा दाबल्याने हॅकिंग थांबते हा दावा फक्त सोशल मीडियावरची अफवा आहे. खरं सुरक्षेसाठी जागरूकता, सुज्ञ निर्णय आणि बँकेच्या मार्गदर्शक सूचना यांवरच विसंबून राहणे योग्य.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
'ATM मध्ये गेल्यावर 2 वेळा दाबा कॅन्सल बटण, नाही केलात तर.... ' काय सांगतं RBI? लगेच वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल