GST: मोदी सरकारकडून दसऱ्याआधीच गिफ्ट, आजपासून घरातल्या या वस्तू मिळणार स्वस्त
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
GST 2.0 आजपसून लागू करण्यात आलं आहे. देशभरात 22 सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून नवे दर लागू होतील. त्यानुसार 12-18 टक्क्यांचे स्लॅब 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. तर 28 टक्के स्लॅबमध्ये चैनीच्या, महागड्या वस्तूंवर लागणार आहे. नव्या GST च्या बदलाच्या निर्णयामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार असून, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
1/6

केंद्र सरकारने अनेक गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करून 5% केला आहे. यामुळे खाद्यपदार्थ, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि कपड्यांचा समावेश आहे. त्यामुळे लोकांचा घरगुती खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
advertisement
2/6
5% जीएसटी स्लॅब: यामध्ये खाद्यपदार्थ (उदा. तूप, बिस्किटे, चॉकलेट), अनेक औषधे, तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू (उदा. शॅम्पू, साबण, टूथपेस्ट, कपडे) आणि शेतीशी संबंधित उत्पादनांचा समावेश आहे.
advertisement
3/6
18% जीएसटी स्लॅब: ज्या वस्तूंवर आधी 28% किंवा त्याहून अधिक कर होता, त्या आता 18% स्लॅबमध्ये आल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लहान वाहने आणि ऑटो पार्ट्स थोडे स्वस्त होणार आहेत. यामध्ये एसी, टीव्ही, फ्रिज, मोटारसायकल, लॅपटॉप आणि काही महागड्या पादत्राणांचा समावेश आहे.
advertisement
4/6
40% जीएसटी स्लॅब: या स्लॅबमध्ये लक्झरी आणि हानिकारक वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. यामध्ये लक्झरी कार, विमान, शस्त्रे, तंबाखू उत्पादने, दारू, कोल्ड ड्रिंक्स आणि जुगारासारख्या सेवांचा समावेश होतो.
advertisement
5/6
0% जीएसटी स्लॅब: या स्लॅबमध्ये अशा वस्तू आणि सेवा येतात, ज्यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक मानले जाते. यामध्ये यूएचटी दूध, शालेय वस्तू आणि विमा-कल्याणकारी सेवांचा समावेश आहे.
advertisement
6/6
जर एखादा दुकानदार नवीन जीएसटी दर लागू करत नसेल, तर तुम्ही तातडीने बिल तपासले पाहिजे आणि योग्य दराने बिल देण्याची मागणी करावी. जर दुकानदार तयार न झाल्यास, तुम्ही बिल सुरक्षित ठेवून ग्राहक मंचात किंवा जीएसटी हेल्पलाइनवर तक्रार करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
GST: मोदी सरकारकडून दसऱ्याआधीच गिफ्ट, आजपासून घरातल्या या वस्तू मिळणार स्वस्त