Cidco Lottery 2024 : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोकडून 902 घरांसाठी लॉटरी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Cidco Lottery 2024 : दृष्ट्या दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गट अशा तीन गटांसाठी अर्ज भरता येणार आहेत.
advertisement
1/7

नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोने 902 घरांची योजना जाहीर केली आहे. या घरांच्या ऑनलाइन नोंदणीला आजपासून सुरुवात होत आहे.
advertisement
2/7
10 ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळंबोली, खारघर आणि घणसोली या भागातील घरांसाठी ही मोठी लॉटरी असणार आहे.
advertisement
3/7
दृष्ट्या दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गट अशा तीन गटांसाठी अर्ज भरता येणार आहेत.
advertisement
4/7
कळंबोली EWS साठी 6 घरं उपलब्ध आहेत. ज्याची किंमत 26 लाख 32 हजार 368 रुपये आहे. घणसोलीत EWS साठी फक्त 1 घर असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 26 लाख 9 हजार 420 रुपये आहे.
advertisement
5/7
खारघरमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी सेलीब्रेशन इथे 10 घरं आहेत . त्याची किंमत 66 लाख रुपये आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 23 घरं असून त्याची किंमत 1 कोटी 13 लाख 93 हजार रुपये आहे.
advertisement
6/7
कळंबोलीमध्ये सर्वसाधारण गटासाठी 31 घरं लॉटरीत आहेत. ज्याची किंमत 37 लाख 47 हजार 159 रुपये आहे. घणसोलीमध्ये सर्वसाधारण गटासाठी 31 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 36 लाख 72 हजार 505 रुपये आहे.
advertisement
7/7
तुम्हाला सिडकोच्या ऑनलाईन साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्र भरायची आहेत. या सगळ्याचं व्हेरिफिकेशन होणार असून तुम्हाला ओरिजनल सर्टिफिकेटही व्हेरिफिकेशनसाठी तयार ठेवावे लागणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Cidco Lottery 2024 : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोकडून 902 घरांसाठी लॉटरी