Currency : भारताचा 1 रुपया नेपाळमध्ये किती? तेथील करंसीला काय म्हणतात?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही प्रश्न अनेकांच्या मनात येतात ते म्हणजे जसा भारतात रुपया चालतो तशी नेपाळची करंसी काय? आणि ही करंसी भारताच्या रुपयापेक्षा जास्त आहे की कमी? म्हणजे आपल्या भारतीय 1 रुपयाची भारतात किंमत काय?
advertisement
1/6

नेपाळ हा भारताच्या बाजूचा देश आहे आणि या दोन्ही देशांच्या बॉर्डर नागरीकांना प्रवेशासाठी खुल्या असल्यामुळे अनेक बॉर्डरवर रहाणाऱ्या नागरीकांसाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाणं सामान्य झालं आहे. दोन्ही ही देशातील नागरीकांना प्रवेशासाठी व्हिसाची आवशकता लागत नाही त्यामुळे तिथे सर्व काही सामान्य आहे.
advertisement
2/6
भारतात देखील अनेक नेपाळी लोक नोकरीसाठी येतात. पण अशात एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो तो म्हणजे जसा भारतात रुपया चालतो तशी नेपाळची करंसी काय? आणि ही करंसी भारताच्या रुपयापेक्षा जास्त आहे की कमी? म्हणजे आपल्या भारतीय 1 रुपयाची नेपाळमध्ये किंमत काय?
advertisement
3/6
सध्या उपलब्ध माहितीनुसार भारतीय रुपये ₹ 1 = 1.60 नेपाळी रुपये दर आहे. म्हणजेच तुम्ही जर भारतातील 100 रुपये तिथे घेऊन गेलात तर तुम्हाला जवळपास 160 नेपाळी रुपये मिळतील. आपण जसं भारतीय करंसींला रुपया म्हणतो तसं निपाळी करंसीला नेपाळी रुपये म्हणतात ज्याचा शॉर्टकट NPR (Nepalese Rupee) असा होतो.
advertisement
4/6
हा दर का स्थिर आहे?1994 पासून भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये चलन विनिमयासाठी एक निश्चित दर ठरवण्यात आला. त्यानुसार 1 भारतीय रुपया = 1.60 नेपाळी रुपये हा दर लागू करण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार, प्रवास आणि दैनंदिन व्यवहार अधिक सोपे झाले.
advertisement
5/6
व्यवहार करताना लक्षात ठेवाबँक किंवा मनी एक्सचेंज सेंटरकडे व्यवहार करताना हा दर थोडा बदलू शकतो. काही सेवा पुरवठादार (जसे की वायझ, वेस्टर्न युनियन) यात अतिरिक्त शुल्क घेतात. मोठी रक्कम बदलताना नेहमी अधिकृत ठिकाणीच व्यवहार करावा.
advertisement
6/6
साधं उदाहरण500 भारतीय रुपयाची किंमत = सुमारे ₹ 800 नेपाळी रुपये, तर ₹ 1000 भारतीय रुपये = सुमारे ₹ 1600 नेपाळी रुपये