TRENDING:

FASTag चे बदलणार नियम! आता UPI ने Payment, पटापट चेक करा मोदी सरकारची ऑफर

Last Updated:
केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार FASTag इनव्हॅलिड असला तरी दंड कमी, UPI पेमेंटची सुविधा, टोल एजन्सींना पावती अनिवार्य, NHAI कडून QR कोड फलकांची योजना.
advertisement
1/7
FASTag चे बदलणार नियम! आता UPI ने Payment, पटापट चेक करा सरकारची ऑफर
केंद्र सरकारने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला. १५ नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनावर FASTag नसेल, किंवा काम करत नसेल किंवा पुरेसा बॅलन्स नसल्यामुळे इनव्हॅलिड झाला असेल, तरीही तुम्हाला टोल प्लाझावर दंड भरावा लागणार नाही. सध्या त्यासाठी दुप्पट टोल भरावा लागत आहे.
advertisement
2/7
जर FASTag व्हॅलिड नसेल तर चालकांना नियमित टोलच्या केवळ 1.25 पट दंड भरावा लागणार. विशेष म्हणजे, ही वाढीव रक्कम UPI द्वारे भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
3/7
टोल नाक्यांवरील रोख व्यवहार पूर्णपणे संपुष्टात आणणे हा यामागचा उद्देश आहे. सध्या टोल वसुलीपैकी जवळपास ९८% व्यवहार FASTag द्वारे होतात. मात्र, काही कारणांमुळे लोकांना रोख रक्कम भरावी लागते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमांमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल आणि टोल नाक्यांना पूर्णपणे कॅशलेस करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
advertisement
4/7
रोखीनं व्यवहार करणं बंद करावं आणि व्यवहारात पारदर्शकता राहावी हा यामागचा उद्देश आहे. या बदलांमध्ये आणखी एक महत्त्वाची सवलत मिळणार आहे. जर तुमच्याकडे वैध आणि पुरेसा बॅलन्स असलेला FASTag असेल, पण टोल प्लाझावरील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बिघडल्यामुळे टोल भरता आला नाही, तर वाहनधारकाला कोणताही टोल न भरता थेट पुढे जाण्याची परवानगी मिळेल.
advertisement
5/7
यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा नंतर पैसे कापून घेतले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, टोल एजन्सीला वाहनधारकाला Zero-transaction receipt देणं बंधनकारक असणार आहे. टोल वसुली करणाऱ्या एजन्सींना जबाबदार धरण्यासाठीही नियम कठोर केले आहेत.
advertisement
6/7
आता टोल एजन्सींना अनिवार्यपणे पावती द्यावी लागेल, ज्यात टोल भरल्याची तारीख, वेळ, प्राप्त झालेली एकूण रक्कम आणि कोणत्या श्रेणीच्या वाहनाचा टोल भरला, याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे टोल वसुली यंत्रणांची गुणवत्ता राखण्यास मदत होईल. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने एक वेगळा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
advertisement
7/7
महामार्गांवर आता QR कोड असलेले फलक बसवले जाणार आहेत. हे QR कोड प्रवाशांना प्रकल्पाची विशिष्ट माहिती आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक असतील. तिथे तुम्ही याबाबत तक्रार देखील करु शकणार आहात. इतकंच नाही तर विश्रांती स्थळ, टोल प्लाझा, ट्रक आणि बस स्टॉप आणि महामार्गाच्या सुरुवातीच्या/अंतिम ठिकाणी याचे होर्डिंग्स लावले जातील, ज्यामुळे प्रवाशांना आवश्यक ती मदत आणि माहिती सहज उपलब्ध होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
FASTag चे बदलणार नियम! आता UPI ने Payment, पटापट चेक करा मोदी सरकारची ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल