SBI किंवा PNB नाही, तर या सरकारी बँक FD वर देताय सर्वाधिक व्याज, चेक करा लिस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Fixed Deposits :भारतीय लोक फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD मध्ये भरपूर पैसे गुंतवतात. रिटर्नची गॅरंटी आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे लोक एफडीला प्राधान्य देतात. FD बद्दल अजून एक खास गोष्ट आहे. भारतात, लोक मोठ्या बँकांमध्ये जास्त एफडी करतात, तर लहान बँका जास्त व्याज देतात. आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी बँकांबद्दल सांगणार आहोत, जे तीन वर्षांच्या कार्यकाळातील एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत.
advertisement
1/7

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. एफडी करण्यासाठी ही बँक भारतीयांची पहिली पसंती आहे. सरकारी बँकांमध्ये केलेल्या एकूण एफडीमध्ये त्याचा हिस्सा 36 टक्के आहे. परंतु, FD वर व्याज देण्याच्या बाबतीत ते पहिल्या स्थानावर नाही.
advertisement
2/7
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल. देशातील एकूण एफडी ठेवींमध्ये बँक ऑफ बडोदाचा हिस्सा 6 टक्के आहे. सरकारी बँकांच्या एकूण एफडीमध्ये बँक ऑफ बडोदाचा वाटा 10 टक्के आहे.
advertisement
3/7
पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देतेय. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये होईल. देशातील एकूण एफडी ठेवींमध्ये पंजाब नॅशनल बँकेचा हिस्सा 6 टक्के आहे. सरकारी बँकांच्या एकूण एफडीमध्ये पीएनबीचा वाटा 10 टक्के आहे.
advertisement
4/7
कॅनरा बँक तीन वर्षांच्या एफडीवर 6.8 टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. कॅनरा बँकेत जमा केलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.22 लाख रुपये होईल. देशातील एकूण एफडीमध्ये कॅनरा बँकेचा हिस्सा 12 टक्के आहे.
advertisement
5/7
युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक तीन वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. या तिन्ही बँकांमध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.21 लाख रुपये होईल. देशातील एकूण एफडीपैकी 11 टक्के एफडी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये केल्या जातात.
advertisement
6/7
देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तीन वर्षांच्या FD वर व्याज देण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. SBI तीन वर्षांच्या FD वर वार्षिक 6.5 टक्के दराने व्याज देते. एसबीआयमध्ये केलेली 1 लाख रुपयांची एफडी रक्कम तीन वर्षांत वाढून 1.21 लाख रुपये होईल.
advertisement
7/7
युको बँक तीन वर्षांच्या एफडीवर 6.3 टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.21 लाख रुपये होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
SBI किंवा PNB नाही, तर या सरकारी बँक FD वर देताय सर्वाधिक व्याज, चेक करा लिस्ट