TRENDING:

Gold And Silver Rate: बजेटमधील घोषणेनंतर सोनं तुम्हाला किती स्वस्त मिळणार? किती पैसे वाचणार

Last Updated:
Custom Duty on Gold And Silver Rate : गर्लफ्रेंड-बायकोला करा खूश, गिफ्टमध्ये सोनंच द्या! पाहा किती स्वस्त झालं
advertisement
1/11
बजेटमधील घोषणेनंतर सोनं तुम्हाला किती स्वस्त मिळणार? किती पैसे वाचणार
तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा पत्नीला सोन्याची-चांदीची किंवा प्लॅटिनमची वस्तू भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मोदी सरकारने आपल्या बजेटमध्ये सोन्या-चांदीच्या दराबाबत मोठी घोषणा केली आहे. - फोटो सौजन्य - AI
advertisement
2/11
सोनं-चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने स्वस्त होणार आहे. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठी घट करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर १५ टक्के कस्टम ड्युटी लावली जात होती. - फोटो सौजन्य - AI
advertisement
3/11
यंदाच्या बजेटनुसार सोनं-चांदीच्या दागिन्यांवर 6 टक्के कस्टम ड्युटी लावली जाणार आहे. तर प्लॅटिनमवर 6.4 टक्के कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिन्ही प्रकारचे दागिने येत्या काळात स्वस्त होणार असून मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक वाढू शकते. - फोटो सौजन्य - AI
advertisement
4/11
अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मांडताना सांगितलं की, 'देशातील सोने आणि मौल्यवान धातूंच्या दागिन्यांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवण्यासाठी मी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्के आणि प्लॅटिनमवर 6.4 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देत आहे. - फोटो सौजन्य - AI
advertisement
5/11
सोन्याचा कॉईन: कस्टम ड्यूटी म्हणजेच आयात शुल्क 15% वरून 6% पर्यंत कमी केले. सोन्याचं बिस्कीट- आयात शुल्क १४.३५% वरून ५.३५% - फोटो सौजन्य - AI
advertisement
6/11
चांदीची नाणी: आयात शुल्क 15% वरून 6% केले. चांदीचं बिस्कीट - आयात शुल्क १४.३५% वरून ५.३५% करण्यात आलं आहे. - फोटो सौजन्य - AI
advertisement
7/11
प्लॅटिनम, पॅलेडियम, ऑस्मियम, रुथेनियम, इरिडियम: आयात शुल्क 15.4% वरून 6.4% पर्यंत कमी केले - फोटो सौजन्य - AI
advertisement
8/11
मौल्यवान धातूची नाणी: आयात शुल्क 15% वरून 6% करण्यात आलं आहे. सोने/चांदीचे दागिने: आयात शुल्क 15% वरून 6% केलं आहे. - फोटो सौजन्य - AI
advertisement
9/11
जर तुम्ही आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्याची सध्याची किंमत 67,510 रुपये आहे. सध्या 15 टक्के कस्टम ड्युटी म्हणजेच 10,126 रुपये आयात शुल्क आहे. मात्र, आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी 6 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे. - फोटो सौजन्य - AI
advertisement
10/11
या घोषणेनंतर आता याच सोन्याची किंमत सुमारे 62 हजार रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजेच अर्थसंकल्पाच्या या घोषणेनंतर 10 ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे 5 रुपयांनी स्वस्त होणार आहेत. - फोटो सौजन्य - AI
advertisement
11/11
चांदीबद्दल बोलायचे झाले तर आज एक किलो चांदीची किंमत 88,983 रुपये आहे. यावर देखील 15% कस्टम ड्युटीनुसार 12 हजार रुपये कर आकारला जातो. आता 6% कस्टम ड्युटी जोडल्यास ते सुमारे 7000 रुपयांनी स्वस्त होईल. 15.4 टक्के आयात शुल्कासह 10 प्लॅटिनमची किंमत आज 25,520 रुपये आहे, जी आता सुमारे 2000 रुपयांनी स्वस्त होईल. - फोटो सौजन्य - AI
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold And Silver Rate: बजेटमधील घोषणेनंतर सोनं तुम्हाला किती स्वस्त मिळणार? किती पैसे वाचणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल