12 तासांत दीड हजार रुपयांनी वाढली चांदी, सोन्याचा आजचा भाव काय, ग्रॅममागे किती मोजावे लागणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनऊ, चंदीगड, अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद येथे सोन्या-चांदीच्या दरात घसरण; चांदीची औद्योगिक मागणी वाढली.
advertisement
1/7

देशातील मौल्यवान धातूंच्या बाजारात पुन्हा एकदा चढ-उतार दिसत आहेत. 6 ऑक्टोबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी सोनेाच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 10 ग्रॅमसाठी 1,19,540 रुपयांवर आला आहे.
advertisement
2/7
22 कॅरेट सोन्याचाही दर कमी झाला आहे. तरीसुद्धा, गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 3,920 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 3,600 रुपयांची वाढ झाली होती. दिल्लीमध्ये 6 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,19,540 रुपये इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,09,590 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे.
advertisement
3/7
मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यातील भाव या प्रमुख शहरांमध्ये सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,09,440 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,19,390 रुपये आहे. जयपूर, लखनऊ आणि चंदीगड इथे 24 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीप्रमाणेच 10 ग्रॅमसाठी 1,19,540 रुपये आहे, तर 22 कॅरेटचा दर 1,09,590 रुपये नोंदवला गेला आहे.
advertisement
4/7
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते, चांदीचे दर दीड हजार रुपयांनी वाढले आहेत. चांदीचे दर १ लाख 55 हजार ९०१ रुपये प्रति किलो आहेत. तर सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी 1 लाख 23 हजार 270 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेटसाठी 1 लाख 18 हजार रुपये प्रति तोळा पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
5/7
24 कॅरेट एक ग्रॅमसाठी ग्राहकांना 12 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट एक ग्रॅमसाठी सोन्यासाठी 11070 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 18 कॅरेट सोन्यासाठी 9 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 8 ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी 72 हजार रुपये मोजावे लागणार आहे. इंडियन बुलियन असोसिएशनच्या दरांनुसार सोन्याचे दर आणखी वाढले आहेत.
advertisement
6/7
सोनेप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण दिसत आहे. 6 ऑक्टोबर रोजी चांदीचा दर घसरून प्रति किलोसाठी 1,54,900 रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे, मागील सप्टेंबर महिन्यात चांदीने किंमतवाढीच्या बाबतीत सोनेलाही मागे टाकले होते. गेल्या महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 19.4 टक्क्यांची वाढ झाली होती, तर याच कालावधीत सोन्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला.
advertisement
7/7
तज्ज्ञांच्या मते, चांदी गुंतवणुकीसाठी तर आकर्षक पर्याय आहेच, पण तिची औद्योगिक मागणीही मोठी आहे. एकूण मागणीपैकी 60 ते 70 टक्के हिस्सा औद्योगिक वापराचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी काळातही चांदीची मागणी आणि किंमत दोन्ही स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
12 तासांत दीड हजार रुपयांनी वाढली चांदी, सोन्याचा आजचा भाव काय, ग्रॅममागे किती मोजावे लागणार?