TRENDING:

सोनं खरेदीचा प्लॅन करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आज भाव झाले कमी, पाहा किती

Last Updated:
सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सोनं खरेदी करण्याची प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण आज सोन्याचे भाव घसरले आहेत.
advertisement
1/6
सोनं खरेदीचा प्लॅन करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आज भाव झाले कमी, पाहा किती
Gold Silver Prices Today : आज 18 मार्च 2026 रोजी सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव सकाळी 9 वाजता 266 रुपयांच्या घसरणीसह 155719 रुपये प्रति 10 ग्रामवर व्यवहार करत आहे.
advertisement
2/6
चांदीमध्येही 1812 रुपयांची घसरण झाली आहे. आता चांदी 251301 रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेड करतेय. सोन्याच्या भावात 18 मार्च रोजी इंटरनॅशनल मार्केटमध्येही घसरण पाहिली जातेय.
advertisement
3/6
सोनं 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह 4994 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करतेय. चांदी 1.33 टक्के कोसळून 78.855 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करतेय. 1 महिन्यात पहिल्यांदा चांदीच्या किंमती या 80 डॉलरच्या खाली आल्या आहेत.
advertisement
4/6
सीएनबीसीचे अॅनालिस्ट सांगतात की, सोन्याच्या किमतींमधील मर्यादित चढ-उतार हा यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबतच्या अनिश्चिततेमुळे आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे जतीन त्रिवेदी म्हणाले की, सोन्याचा भाव प्रति औंस सुमारे 5,000 डॉलर असून, यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी बाजार सावध आहे, त्यामुळे किमती एका मर्यादित कक्षेत फिरत आहेत.
advertisement
5/6
गुंतवणूकदारांसाठी एनालिस्टचा सल्ला : मिंटच्या रिपोर्टनुसार, इंडसइंड सिक्योरिटीजचे जिगर त्रिवेदी सांगतात की, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा महागाईवर होणारा परिणाम लक्षात घेता गुंतवणूकदार सावध आहेत, त्यामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
advertisement
6/6
बाजाराला अपेक्षा आहे की, US फेड मार्चमध्ये व्याजदर बदलेले नाही, परंतु गुंतवणूकदार आता मध्यवर्ती बँकेच्या भूमिकेवर, विशेषतः वाढत्या ऊर्जा किमती आणि मंदावलेल्या कामगार बाजाराबाबत बारकाईने लक्ष ठेवतील. अॅनालिस्ट सांगतात की, एमसीएक्स गोल्ड एप्रिल फ्युचर्स आज कमजोर राहतील आणि दर प्रति 10 ग्रॅम ₹1,55,000 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सोनं खरेदीचा प्लॅन करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आज भाव झाले कमी, पाहा किती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल