चुकीला माफी नाही! आधार कार्ड अपडेट करताना सावधान! होऊ शकते जेल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आजकाल कुठल्याही कारणासाठी आधार कार्ड आणि आधार नंबर फार महत्त्वाचं झालं आहे. अगदी शाळेत अॅडमिशन घेण्यापासून ते मोबाईल नंबर, बँक खात्यापर्यंत ते हॉस्पिटलला अॅडमिट होण्यापर्यंत सगळीकडे आधार कार्ड आवश्यक आहे. मग अशावेळी तुमच्या आधार कार्डची KYC अपडेट नसेल किंवा आधार कार्ड बनवताना चुकीची माहिती दिली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
1/8

आजच्या डिजिटल युगात, आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र नाही तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बँक खात्यांपासून ते सरकारी योजनांपर्यंत सर्वत्र ते आवश्यक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आधार कार्डमध्ये जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्यास किंवा दुसऱ्याचा आधार वापरल्यास तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो आणि मोठा दंड देखील होऊ शकतो. याबद्दल येथे जाणून घ्या.
advertisement
2/8
आधार बनवताना किंवा अपडेट करताना बरेच लोक अनवधानाने किंवा जाणूनबुजून चुकीची माहिती देतात. जर चूक झाली असेल तर तुम्हाला ती दुरुस्त करण्याची संधी दिली जाते, जर ही चूक जाणूनबुजून केली असेल त्या व्यक्तीला जेल होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/8
जाणूनबुजून तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची दिली तर तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. एवढेच नाही तर जर तुम्ही बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवले किंवा दुसऱ्याची ओळख वापरली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
advertisement
4/8
चुकीची माहिती देणारा व्यक्ती सापडला तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तुमच्या आधार कार्डवर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर ती तातडीनं बदलणं आवश्यक आहे.
advertisement
5/8
जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून दुसऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरले तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १०,००० ते एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
advertisement
6/8
जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची आधार माहिती त्याच्या संमतीशिवाय ठेवली किंवा दुसऱ्या कोणाशी शेअर केली तर हा देखील एक गंभीर गुन्हा आहे. आधार कायद्याच्या कलम ३९ अंतर्गत, यामुळे ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
advertisement
7/8
जर एखादी व्यक्ती किंवा संस्था UIDAI द्वारे अधिकृत एजन्सी असल्याचा दावा करून लोकांची माहिती गोळा करत असेल तर त्या व्यक्तीला ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १०,००० रुपये दंड होऊ शकतो आणि जर एखाद्या कंपनीने हे काम केले तर त्यावर १ लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
advertisement
8/8
आधारच्या सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी (CIDR) मध्ये छेडछाड किंवा हॅक करण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. अशा परिस्थितीत, १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.