TRENDING:

31 डिसेंबरआधी करुन घ्या 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

Last Updated:
वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फक्त नवीन वर्षाची तयारी नाही, तर अनेक महत्त्वाच्या सरकारी कामांची अंतिम मुदतही याच महिन्यात असते. जर तुम्ही ही कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला मोठा दंड, व्याज किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करदात्यांसाठी डिसेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा आहे.
advertisement
1/6
31 डिसेंबरआधी करुन घ्या ही महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी देखील 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केलं नाही तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. जर तुम्ही अर्ज केला असेल पण नंबरप्लेट घेतली नसेल तर 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे तातडीनं नंबरप्लेटचं काम पूर्ण करा.
advertisement
2/6
जर तुम्ही अद्याप आर्थिक वर्ष २०२४-२५ चा आयकर रिटर्न भरला नसेल, तर तुमच्याकडे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची वेळ आहे. या मुदतीनंतर तुम्ही ITR भरल्यास, तुम्हाला लेट फाइलिंग फी आणि व्याज भरावे लागेल. उशिरा ITR भरणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे.
advertisement
3/6
ज्या लोकांची Annual Tax Liability १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना १५ डिसेंबर पर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरणे बंधनकारक आहे. ही रक्कम वेळेवर न भरल्यास, त्यावर व्याज आणि पेनल्टी लागू होऊ शकते. फॉर्म २७ सी (Form 27C) चे डिक्लेरेशन अपलोड करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे.
advertisement
4/6
लाडकी बहीण योजनेची E KYC कऱण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. ज्या लाभार्थी महिला E KYC करणार नाहीत त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात येईल. याशिवाय कागदपत्रात त्रुटी आढळली, आधार आणि फोन नंबर लिंक नसेल तरीही नाव वगळण्यात येईल.
advertisement
5/6
तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आता अनिवार्य आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ३१ डिसेंबरपर्यंत लिंकिंग करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर लिंकिंग न केल्यास, तुमचे पॅन कार्ड इनव्हॅलिड होऊ शकते आणि बँक व्यवहार ते गुंतवणुकीपर्यंत अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात. जर तुम्ही हे केलं नाही तर 10 हजार रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो.
advertisement
6/6
या डेडलाईन्सकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला केवळ आर्थिक नुकसान होणार नाही, तर भविष्यात तुमच्या टॅक्स रेकॉर्डवरही नकारात्मक परिणाम होईल. ३१ डिसेंबर हा केवळ वर्षाचा शेवटचा दिवस नाही, तर करदात्यांसाठी ही एक मोठी अंतिम मुदत आहे. ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करून तुम्ही दंड टाळू शकता, जर तसं झालं नाही तर दंड भरायला पैसे तयार ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
31 डिसेंबरआधी करुन घ्या 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल