लाडक्या बहिणींच्या नावे पैसे घेतलेल्या दाजी-भावजींवर गुन्हा दाखल होणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेत १४ हजारहून अधिक पुरुषांनी पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरुषांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
1/6

लाडकी बहीण योजनेत अनेक घोटाळे झाल्याचं समोर आलं आहे. सरकारी महिला, 65 वर्षांवरील महिला ज्या नियमात बसत नाहीत त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला. इतकंच नाही तर 14 हजारहून अधिक पुरुषांनी लाडक्या बहिणीच्या नावाने पैसे उकळले होते. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
2/6
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गरीब व गरजू महिलांसाठी असतानाही १४ हजारांहून जास्त पुरुषांनी त्या योजनेचे पैसे घेतल्याचे नुकतेच उघड झाले होते. या पुरुषांकडून आता ते पैसे वसूल केले जाणार आहेत.
advertisement
3/6
ज्या दाजी भावजींनी किंवा पुरुषांनी लाडकी बहीणच्या नावे पैसे घेतले आहेत त्यांना सरकारकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की पैसे घेऊन आम्ही सुटलो ते सगळे अडकणार आहेत.
advertisement
4/6
ज्या पुरुषांन पैसे घेतले त्यांनी एका महिन्यात पैसे परत न केल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ही रक्कम आतापर्यंत २९ कोटी ४६ लाख रुपये इतकी ही रक्कम आहे.
advertisement
5/6
लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही. हा हप्ता 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी खात्यावर जमा होईल. ज्या महिलांची नावं स्क्रुटिनीत वगळण्यात आली आहेत त्यांना लाभ मिळणार नाही.
advertisement
6/6
यावेळी लाडकी बहीणसाठी कोणताही बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यावर केवळ 1500 रुपये येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.