TRENDING:

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! जानेवारीचा हप्ता अकाउंटमध्ये, बाकीचे कधी येणार?

Last Updated:
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार याची वाट महिला पाहत आहेत.
advertisement
1/7
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! जानेवारीचा हप्ता अकाउंटमध्ये, बाकीचे कधी येणार?
Ladki Bahin Yojana Updates : राज्यभरातील लाडक्या बहिणींना आपला हप्ता अकाउंटमध्ये कधी जमा होतो याची प्रतीक्षा होती. अखेर आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.
advertisement
2/7
विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्यात आली. महिलांच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली.
advertisement
3/7
जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाकडे तब्बल 98 कोटी रुपये जमा केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हप्ते जमा करण्यात आले.
advertisement
4/7
डिसेंबर 2025 चा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्यात जमा करण्यात आला होता. तर आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारीच्या अखेरीस जमा करण्यात आला आहे.
advertisement
5/7
फेब्रुवारी महिना संपत आला आहे. केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. मात्र या महिन्याचा हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये कधी जमा केला जाईल याविषयी राज्य सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
advertisement
6/7
दरम्यान सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या नंतर अनेक महिलांची नावं या यादीतून वगळण्यात आली आहेत. दरम्यान काही महिलांना सतत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ई-केवायसीची मुदत ही 31 मार्च 2026 करण्यात आली आहे.
advertisement
7/7
महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना सुरु केली आहे. तेव्हापासून पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये दरमहा 1500 रुपये जमा करत आहेत. दरम्यान ई-केवायसीमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांना आता या यादीतून वगळण्यात आले आहेत. कारण अनेक महिला या पात्र नसताना या योजनेचा फायदा घेत होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! जानेवारीचा हप्ता अकाउंटमध्ये, बाकीचे कधी येणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल