Ladki Bahin Yojana: या महिलांच्या अकाउंटवर येणार थेट 6 हजार, तुम्हाला किती येतील?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. यातील काही महिलांना पैसे आले आहेत तर अद्यापही काही महिलांना पैसे आलेले नाहीत.
advertisement
1/5

राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. या अंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत.
advertisement
2/5
जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली. ज्या महिलांनी सुरुवातीलाच फॉर्म भरले होते. त्याच्या अकाउंटमध्ये राखी पोर्णिमेच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळी जमा झाला. महिलांना तीन हजार रुपये मिळाले.
advertisement
3/5
अनेक महिलांना फॉर्म भरुनही पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नव्हता. त्यांना आता तिसऱ्या हप्त्यामध्ये थेट साडे चार हजार अकाउंटमध्ये आले आहेत. 25 सप्टेंबरपासून तिसरा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना हे पैसे आले.
advertisement
4/5
मात्र सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरुनही ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही. त्या महिलांच्या अकाउंटमध्ये पुढच्या महिन्यात थेट सहा हजार रुपये जमा होणार आहे. यामुळे तुम्ही सप्टेंबरच्या आधी अर्ज केला असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला जुलै पासून ते सप्टेंबरपर्यंत सर्व हप्ते मिळणार आहेत.
advertisement
5/5
ज्या महिलांनी सप्टेंबर नंतर आपला फॉर्म भरला आहे त्यांना जुलै ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही. त्यांना केवळ सप्टेबरनंतरचे हप्ते मिळणार आहेत. म्हणूनच तिसऱ्या हप्त्यामध्ये त्यांना फक्त दीड हजार येतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojana: या महिलांच्या अकाउंटवर येणार थेट 6 हजार, तुम्हाला किती येतील?