TRENDING:

LIC चा महिलांसाठी खास प्लान! रोज करा फक्त 87 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 11 लाखांचं रिटर्न

Last Updated:
LIC Aadhaar Shila Policy: एलआयसीने महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव LIC आधार शिला पॉलिसी आहे.
advertisement
1/5
LIC चा महिलांसाठी खास प्लान! रोज करा फक्त 87 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 11 लाख
LIC Aadhaar Shila Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या योजना आणतेय. एलआयसीने विशेषतः महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. आज आपण अशाच एका स्किमविषयी जाणून घेऊया. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दीर्घकाळात मजबूत रिटर्न मिळू शकतो. या योजनेचे नाव LIC आधार शिला योजना आहे.
advertisement
2/5
या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही दररोज फक्त रु.87 ची छोटी गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मोठी रक्कम मिळवू शकता. तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर याचे डिटेल्स जाणून घेऊया.
advertisement
3/5
LIC आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक केलेली, वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीच्या मॅच्योरिटीवर, गुंतवणूकदाराला निश्चित रक्कम मिळते. दुसरीकडे, पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.
advertisement
4/5
या योजनेत केवळ आधार कार्ड असलेल्या महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे वय 8 ते 55 वर्षे दरम्यान असावे. तुम्ही ही पॉलिसी 10 वर्षे ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करू शकता. मॅच्योरिटीच्या वेळी, स्त्रीचे कमाल वय 70 वर्षे असू शकते. अशा वेळी, वयाच्या 55 व्या वर्षी, तुम्ही फक्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला 2 लाख रुपयांपासून कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळू शकते.
advertisement
5/5
11 लाख रुपये कसे मिळतील? - मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला LIC आधार शिला पॉलिसीद्वारे 11 लाख रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला दररोज 87 रुपये गुंतवावे लागतील. अशा वेळी, वार्षिक 31,755 रुपये प्रीमियम आकारला जाईल. या प्रकरणात, 10 वर्षांच्या कालावधीतील एकूण जमा राशी रु.3,17,550 असेल. दुसरीकडे, जर तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षी पैसे काढले तर तुम्हाला 11 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LIC चा महिलांसाठी खास प्लान! रोज करा फक्त 87 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 11 लाखांचं रिटर्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल