फक्त 9 दिवस शिल्लक, नंतर मिळणार नाही 4 हजारांपर्यंतची सूट! LIC ची बंद पॉलिसी सुरु करण्याची खास संधी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतीय जीवन बीमा निगम अपने उन तमाम पॉलिसीधारकों के लिए एक खास मौका लेकर आया है, जिनकी पॉलिसी प्रीमियम जमा नहीं होने के कारण बंद पड़ी है. आमतौर पर लैप्स बीमा पॉलिसी को शुरू करने के लिए बड़ी लेट फीस देनी पड़ती है, लेकिन एलआईसी इस पर 30 फीसदी से ज्यादा की छूट दे रही है.
advertisement
1/5

भारतीय जीवन विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. देशभरात एलआयसी पॉलिसीधारकांची संख्या 29 कोटींहून अधिक आहे. प्रिमियम वेळेवर न भरल्यामुळे दरवर्षी हजारो विमाधारकांच्या पॉलिसी लॅप होतात.
advertisement
2/5
तुमची एलआयसी पॉलिसी देखील लॅप्स झाली असेल तर तुम्हाला ती सुरू करण्याची उत्तम संधी आहे. खरंतर, LIC ने लाखो पॉलिसीधारकांना त्यांच्या लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची उत्तम संधी दिली आहे.
advertisement
3/5
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पेशल रिवाइव्हल कँपेनमध्ये, LIC लेट फीसवर 30 टक्के सूट देत आहे. जी वेगवेगळ्या प्रीमियमच्या रकमेनुसार 4000 रुपयांपर्यंत आहे. एलआयसीचे हे स्पेशल रिवाइव्हल कँपेन मोहीम 1 सप्टेंबरपासून सुरू झाले असून ते 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
advertisement
4/5
प्रीमियमची रक्कम 1,00,000 रुपयांपर्यंत असल्यास, तुम्हाला लेट फीसवर 30 टक्के सूट आणि कमाल 3,000 रुपये मिळतील. त्याच वेळी, जर तुमची देय रक्कम 1,00,001 ते 3,00,000 रुपयांच्या दरम्यान असेल, तर लेट फिसवर 30 टक्के सूट आणि कमाल 3,500 रुपये दिले जातील. याशिवाय 3,00,001 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेवर 30 टक्के आणि जास्तीत जास्त 4,000 रुपयांची सूट मिळेल.
advertisement
5/5
LICच्या या स्पेशल रिवाइव्हल कँपनअंतर्गत, शेवटचा प्रीमियम भरल्यानंतर 5 वर्षांपासून बंद असलेल्या सर्व पॉलिसी सुरू केल्या जाऊ शकतात. तसंच, पॉलिसीनुसार त्याच्याशी संबंधित सेवा आणि शर्ती बदलू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही LIC वेबसाइट आणि जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधू शकता. LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC च्या देशभरात हजारो शाखा आणि लाखो एजंट आहेत आणि 29 कोटींहून अधिक विमाधारक लोक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
फक्त 9 दिवस शिल्लक, नंतर मिळणार नाही 4 हजारांपर्यंतची सूट! LIC ची बंद पॉलिसी सुरु करण्याची खास संधी