TRENDING:

Tree Farming: या एक किलो लाकडाच्या किंमतीत येईल मारुती बलेनो, 1 झाडातून होते 7 कोटींची कमाई! भारतात लागवत करता येते का?

Last Updated:
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : भारतात चंदनाच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं. कारण हे खूप दुर्मिळ आहे आणि खूप जास्त महागडं आहे. एक किलो चंदनाचं लाकूड 7-8 हजार रुपयांना मिळतं. पण हे सर्वात महाग लाकूड नाही हे तुम्हाला माहितीये का? आज आम्ही तुम्हाला अशा झाडाविषयी सांगणार आहोत. ज्याच्या एक किलो लागडाची किंमत लाखोंमध्ये आहे.
advertisement
1/6
या एक किलो लाकडाच्या किंमतीत येईल मारुती बलेनो, 1 झाडातून होते 7 कोटींची कमाई!
आज आपण आफ्रिकन ब्लॅकवुडबद्दल बोलत आहोत. हे लाकूड प्रामुख्याने आफ्रिकेतील कोरड्या प्रदेशात आढळते. या झाडाच्या एक किलो लाकडाची किंमत सात लाख रुपये आहे. चंदनाचे लाकूड जितके दुर्मिळ आहे, तितकेच आफ्रिकन ब्लॅकवुडही दुर्मिळ आहे.
advertisement
2/6
त्याची दुर्मिळता त्याला इतके महाग बनवते. त्याचे झाड फार मोठे देखील नसते. साधारणपणे त्याचे झाड सुमारे 1 क्विंटलच्या जवळपास असते. या दृष्टिकोनातून पाहिले तर एका झाडाची किंमत सात कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते. म्हणजे एक झाड विकूनही तुम्ही करोडपती होऊ शकता.
advertisement
3/6
या लाकडाचा उपयोग म्यूझिकल इंस्टूमेंट्स जसे की बासरी, गिटार इत्यादी वाद्ये बनवण्यासाठी केला जातो. एवढेच नाही तर या लाकडाचा उपयोग फर्निचर बनवण्यासाठीही केला जातो. पण त्यापासून बनवलेले फर्निचर इतके महाग आहे की सामान्य माणसाला ते विकत घेणे फार कठीण आहे.
advertisement
4/6
दुर्मिळतेमुळे चंदनाप्रमाणे त्याचीही मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ते पूर्ण परिपक्व होण्याआधीच तस्कर ते कापतात. हे झाड पूर्णपणे तयार होण्यासाठी 60 वर्षे लागतात. तस्कर त्यापूर्वी कापून बाजारात विकतात. अशा वेगाने झाडे तोडल्यामुळे त्यांची संख्या कमी होते आणि त्यांचे मूल्य आणखी वाढते.
advertisement
5/6
कहर म्हणजे टांझानियासारख्या देशात आफ्रिकन ब्लॅकवुडच्या संरक्षणासाठी सशस्त्र सैनिक तैनात केले जात आहेत. त्यांच्या सुरक्षेवरचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लोक त्यांना उगवणे सोडून देत आहेत आणि ते आणखीच दुर्मिळ होतेय.
advertisement
6/6
आता प्रश्न असा आहे की, ते भारतात पिकवता येईल का? तर उत्तर होय आहे. भारतात उत्तर भारतीय रोजवूड म्हणून ओळखले जाते. मात्र, ते तयार व्हायला इतका वेळ लागतो की लोकांना ते वाढवायचे नसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Tree Farming: या एक किलो लाकडाच्या किंमतीत येईल मारुती बलेनो, 1 झाडातून होते 7 कोटींची कमाई! भारतात लागवत करता येते का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल