वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी, सुरू केला व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
या तरुणाने त्याचे शिक्षण पूर्ण करून योग्य वयातच घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी डीजे कव्हर बनविण्याचा एक वेगळा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
1/7

आयुष्यात पुढे जाण्याची धमक अंगी असल्यास कुठल्याही शिक्षणाचा अथवा वयाचा काहीच फरक पडत नसतो. असेच एक उदाहरण नाशिक येथील 25 वर्षीय तरुण रोहित वाघ याचे आहे. या तरुणाने त्याचे शिक्षण पूर्ण करून योग्य वयातच घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी डीजे कव्हर बनविण्याचा एक वेगळा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
2/7
इतकेच नाही तर या व्यवसायामुळे त्याला एक वेगळीच ओळख देखील मिळाली आहे. डीजे कव्हर मेनिफॅक्चरिंग या व्यवसायाच्या माध्यमातून रोहित महिन्याभरत 1 लाखांची कमाई देखील करत आहे. कमी खर्चातच योग्य मार्ग शोधला तर यश नक्की प्राप्त होते हे त्याने नवीन पिढीला दाखवून दिले आहे.
advertisement
3/7
रोहित याने 10 वी नंतर लेदर गुड अँड फूड वेअर या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच वडिलांचे स्वप्न होते की स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा. या करता वडिलांनीच या क्षेत्रात शिक्षण घेण्याचे सांगितल्यानंतर रोहित याने देखील आपले शिक्षण वडिलांच्या म्हणण्यानुसार पूर्ण केले.
advertisement
4/7
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहित याने काही महिने नोकरी देखील केली. परंतु ते म्हणतात ना डोक्यात एखादी गोष्ट बसली तर ती बसूनच जाते. तसेच रोहित याच्या डोक्यात पण व्यवसायाबद्दलच विचार चालायचे. शेवटी रोहित याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुशन बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. आणि त्यातून देखील तो चांगले पैसे कमवीत होता.
advertisement
5/7
सुरुवातीला या व्यवसायात देखील त्याला अडचणी निर्माण होऊ लागल्या. तो सांगतो माझे व्यवसायाला मित्र मला चिडवत असत की काय हे काम करतोस? काय हे घरात बसून राहतोस? परंतु मनात ठरवले होते आपल्या जिद्दीवर उभे राहायचे. नंतर रोहित याने काहीतरी नवीन करावे या करता डीजेसाठी लागणारी वॉटर प्रूफ कव्हर बनविण्यास सुरुवात केली. यात देखील त्याची ही बनवलेली वस्तू बाजारात पोहोचायला अनेक संघर्ष त्याला करावे लागले.
advertisement
6/7
परंतु आज तब्बल 3 वर्षानंतर रोहित याचे डीजे कव्हर बनवून विक्री केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नाव झाले आहे. त्याची कामाची क्वालिटी आणि सर्व्हिसपाहून आता महाराष्ट्रातून देखील त्याला या कव्हरसाठी मागणी होत आहे.
advertisement
7/7
आज तो याच व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 1 ते दीड लाखांची कमाई करत आहे. रोहित सांगतो की, मी कधी मित्रांच्या बोलण्यावरून दुसरीकडे जॉब केला असता तर त्यांच्यासारखेच 10 आणि 12 हजारावर राहिलो असतो परंतु आज माझी महिन्याची कमाई ही त्यांच्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी, सुरू केला व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई