'या' 6 सरकारी स्किममध्ये मिळतो लाखोंचा लाभ! प्रीमियम ₹100 हून कमी, होतो फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सरकारकडून सर्वसामान्य लोकांसाठी आणि कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी अनेक योजना चालवल्या जातात. यामध्ये परवडणाऱ्या किंमतीमध्ये विमा आणि हेल्थ स्किम्स असतात. ज्यामध्ये खुप कमी प्रिमियमवर लाखो रुपयांचा फायदा मिळत असतो. आपात्कालिन परिस्थितीत हे विमा खुप फायदेशीर ठरत असतात.
advertisement
1/9

नवी दिल्ली : सध्याचा काळ खुप कठी आहे. महागाई वाढली आहे. यासोबतच भविष्यही अनिश्चित आहे. असं असताना सर्वसामान्यांसाठी विमा आणि आरोग्य सुरक्षा खुप आवश्यक झाली आहे. सर्व सामान्य नेहमी विचार करतात की विमा घेण्यासाठी जास्त प्रीमियम द्यावं लागेल आणि ते विमा खरेदी करत नाहीत.
advertisement
2/9
केंद्र सरकारने अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये वार्षिक प्रीमियम 100 रुपयांहूनही कमी आहे आणि बदल्या लाखो रुपयांपर्यंत लाभ मिळतो. या योजनांची खास गोष्टमध्ये यामध्ये सामिल होण्यासाठी जास्त औपचारिकता नाही आणि बँक अकाउंट किंवा आधार सारख्या सामान्य डॉक्यूमेंटने रजिस्ट्रेशन होते.
advertisement
3/9
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY), आम आदमी विमा योजना (AABY) आणि निरामय आरोग्य विमा योजना यासारख्या योजना गरीबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंतच्या लोकांसाठी फायदेशीर ठरत आहेत. योग्य माहितीच्या अभावामुळे लोक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत, तर थोडीशी समजदारी त्यांना मोठी आर्थिक सुरक्षा प्रदान करू शकते.
advertisement
4/9
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना : पंतप्रधान सुरक्षा विमा योजना एक कमी पैशात येणारी दुर्घटना विमायोजना आहे. यामध्ये वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. जे थेट बँक अकाउंटमधून कटते. या योजनेअंतर्गत दुर्घटनेमध्ये मृत्यू किंवा दिव्यांगतेच्या परिस्थितीत 2 लाख रुपये आणि आंशिक दिव्यांगतेवर 1 लाख रुपयांपर्यंत विमा कव्हर मिळते. 18 ते 70 वर्षाच्या वयाचे लोक ही योजना खरेदी करु शकतात. रस्ते अपघात, वर्कप्लेसवर दुर्घटना किंवा दुसऱ्या आकस्मित घटनांमध्ये ही योजना कुटुंबाला आर्थिक सहाय्य देते.
advertisement
5/9
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक सोपी आणि परवडणारी जीवन विमा योजना आहे. वार्षिक प्रीमियम ₹436 आहे आणि मृत्यूनंतर, विमाधारकाच्या कुटुंबाला ₹2 लाखांची रक्कम मिळते. 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती या योजनेत नावनोंदणी करू शकतात आणि कव्हरेज वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत चालू राहते. ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी जीवन विमा संरक्षणासाठी एक मजबूत पाया देते.
advertisement
6/9
आयुष्मान भारत योजना : देशातील गरीब आणि असुरक्षित घटकांना चांगल्या आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना सरकारी आणि लिस्टेड प्रायव्हेट रुग्णालयांमध्ये उपचार मिळतात. ही योजना गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन उपचारांचा उच्च खर्च कमी करते. या योजनेमुळे, विशेषतः आजारपणामुळे पूर्वी कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
7/9
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेएवाय) : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेएवाय) ही आयुष्मान भारतचा एक महत्त्वाचा घटक आहे. पात्र कुटुंबांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. यामध्ये रुग्णालयात दाखल होणे, शस्त्रक्रिया, चाचण्या, औषधे आणि पुढील उपचारांचा खर्चाचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत कोणताही प्रीमियम आवश्यक नाही आणि उपचार पूर्णपणे कॅशलेस आहेत. देशभरातील लाखो लोकांना या योजनेअंतर्गत फ्री उपचारांचा लाभ मिळाला आहे.
advertisement
8/9
आम आदमी विमा योजना (AABY) : आम आदमी विमा योजना (AAPY) विशेषतः ग्रामीण भागात आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी डिझाइन केलेली आहे. ही योजना अत्यंत कमी किंवा शून्य प्रीमियमवर जीवन विमा संरक्षण प्रदान करते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ₹30,000 पर्यंत आणि अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास ₹75,000 पर्यंतचे फायदे दिले जातात. ही योजना गरीब कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षेचा एक विश्वासार्ह स्रोत प्रदान करते आणि कठीण काळात आधार देते.
advertisement
9/9
निरामय आरोग्य विमा योजना : निरायम आरोग्य विमा योजना विशेषतः दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या योजनेमध्ये नाममात्र प्रीमियमवर उपचार, औषधी, थेरेपी आणि इतर आरोग्य सेवांचा कव्हर मिळतो. यामध्ये मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक दिव्यांगताशी संबंधित आरोग्य गरजांचा समावेश केलेला असतो. कमी उत्पन्नाच्या कुटुंबासाठी ही योजना मोठा दिलासा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
'या' 6 सरकारी स्किममध्ये मिळतो लाखोंचा लाभ! प्रीमियम ₹100 हून कमी, होतो फायदा