Petrol Pump: तुम्हीही 100 ऐवजी 110 रुपयांचं पेट्रोल टाकता का? यामुळे खरंच जास्त पेट्रोल येतं?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Petrol Pump Fuel Saving Trick: अनेक लोकांना वाटतं की, जर तुम्ही 100 रुपयांच्या जारी 110 रुपयांचं पेट्रोल भरलं तर जास्त पेट्रोल येतं आणि पेट्रोल पंपवाले लोक यामध्ये आपली फसवणूक करु शकत नाहीत.
advertisement
1/6

आधी आपण जाणून घेऊ की, लोक असं का करतात. खरंतर, पेट्रोल पंपावर 100, 200, 500, 1000 सारख्या अमाउंटच्या एंट्रीसाठी वन बटण सिस्टम असते. म्हणजेच ज्या अमाउंटमध्ये जास्त पेट्रोल विकले जाते त्यासाठी कोड सेट ठेवले जातात.
advertisement
2/6
यातून काय होते की, कोणी 200 रुपयांचे पेट्रोल मागितले तर एका कोडचे फक्त एक बटण दाबावे लागते आणि 200 लिहायचे नसते. अशावेळी 3 बटनांऐवजी एकच बटण दाबावे लागते आणि काम पूर्ण होते.
advertisement
3/6
पण, लोकांना असं वाटतं की, जेव्हा पेट्रोल पंप हा कोड सेट करतो. तेव्हा ते त्यात फसवणूक करतात आणि त्यांच्यानुसार लिमिट निश्चित करतात. लोकांचा या शॉर्टकट कीवर विश्वास बसत नाही आणि अशा स्थितीत लोक आपली वेगळी अमाउंट सांगतात.
advertisement
4/6
या कारणामुळे, ज्यावेळी लोकांना 100 रुपयांचे पेट्रोल भरायचे असते तेव्हा ते 105 किंवा 110 रुपयांचे पेट्रोल भरतात किंवा त्यांना 200 रुपयांचे पेट्रोल भरायचे असते तर ते 194, 199, 205 रुपयांचे पेट्रोल भरतात जेणेकरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मॅन्युअली अमाउंट भरावी लागेल. ज्यामुळे तो आपली फसवणूक करु शकणार नाही.
advertisement
5/6
यामुळे फायदा होतो का? या ट्रिकने पेट्रोल भरण्यात लोकांना आनंद होत असला तरी त्याचा खरोखर फायदा आहे याचा पुरावा नाही आणि शॉर्टकट बटणावरून पेट्रोल घेतल्यावर कमी पेट्रोल येते याचाही पुरावा नाही.
advertisement
6/6
तुम्हाला पेट्रोल पंपाबाबत शंका असल्यास, तुम्ही सरकारी मान्यताप्राप्त लिटर मेजरमेंट मगच्या माध्यमातून पेट्रोल पंपाची सत्यता तपासू शकता. यातूनच पेट्रोल पंपाने जेवढे पैसे घेतले तेवढेच पेट्रोल दिले आहे की नाही हे स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Petrol Pump: तुम्हीही 100 ऐवजी 110 रुपयांचं पेट्रोल टाकता का? यामुळे खरंच जास्त पेट्रोल येतं?