Politician salary : पंतप्रधानांपासून तर आमदारापर्यंत, कोणाला किती पगार मिळतो? त्यांना टॅक्स द्यावा लागतो का?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Politician salary in india:पंतप्रधानांपासून तर आमदारांपर्यंत नेत्यांना फक्त सॅलरीच मिळत नाही तर त्यांना अनेक भत्तेही दिले जातात. नेत्यांना मिळणाऱ्या सुविधा देखील त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. चला तर मग जाणून घेऊया देशातील नेत्यांना किती सॅलरी मिळते.
advertisement
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेसिक सॅलरी 1 लाख 60 हजार रुपये आहे. यासोबतच पंतप्रधानांना विविध प्रकारचे सरकारी भत्ते आणि इतर सेवा दिल्या जातात.
advertisement
2/7
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दरमहा 5 लाख रुपये वेतन मिळते. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक राष्ट्रपतीला पगार म्हणून दीड लाख रुपये दिले जातात.
advertisement
3/7
उपराष्ट्रपती जगदीप धनखर: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना राष्ट्रपतींपेक्षा एक लाख रुपये कमी मिळतात. देशाच्या उपराष्ट्रपतींना चार लाख रुपये पगार दिला जातो. पगाराव्यतिरिक्त त्यांना इतर प्रकारचे भत्तेही दिले जातात.
advertisement
4/7
राज्यपाल: भारताच्या राज्यपालांना दरमहा 3.5 लाख रुपये वेतन दिले जाते. राज्यपालांना महिन्याचा पगार 1 लाख 10 हजार रुपये मिळतात आणि सर्व प्रकारचे भत्ते एकत्र केल्यानंतर त्यांना 3.5 लाख रुपये दिले जातात.
advertisement
5/7
मुख्यमंत्री : वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे पगारही वेगवेगळे असतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दरमहा 4 लाख रुपये पगार मिळतो. सर्वाधिक पगार कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचे म्हणजे 4 लाख 21 हजार रुपये. तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना दरमहा 2.85 लाखांचे वेतन मिळते.
advertisement
6/7
आमदार : प्रत्येक राज्याच्या आमदाराचा पगार वेगळा असतो. कलम 164 नुसार प्रत्येक राज्यातील आमदाराचा पगार राज्याच्या विधानसभांद्वारे ठरवला जातो. महाराष्ट्रातील आमदारांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो. यासोबतच इतरही अनेक सोयी सुविधा दिल्या जातात.
advertisement
7/7
काय आहे टॅक्सचा नियम : खासदार असो वा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती, प्रत्येकाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. मात्र, त्यांना पगारावरच टॅक्स भरावा लागतो. म्हणजे खासदारांचे मासिक वेतन एक लाख रुपये आहे. त्यानुसार वार्षिक वेतन 12 लाख रुपये होते. त्यावरच फक्त त्यांना कर भरावा लागतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Politician salary : पंतप्रधानांपासून तर आमदारापर्यंत, कोणाला किती पगार मिळतो? त्यांना टॅक्स द्यावा लागतो का?