TRENDING:

5 वर्ष पैसे गुंतवून कसे मिळवायचे 10,14,964, Post office ची सीक्रेट स्कीम तुम्हाला माहितीय का?

Last Updated:
तुम्हाला जर पोस्ट ऑफिसच्या फिक्स डिपॉझिट स्कीममध्ये अकाउंट उघडायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावे लागेल.
advertisement
1/7
5 वर्ष पैसे गुंतवून कसे मिळवायचे 10,14,964, Post officeची ही स्कीम माहितीय का?
आपण दर महिन्याला जितके पैसे कमवतो, त्यातील एक ठराविक रक्कम बचत करावी, असा अनेकांचा विचार असतो. पण गुंतवणूक करताना ते पैसे सुरक्षित राहतील व त्यावर चांगलं व्याज मिळेल, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी ते विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना शोधत असतात.
advertisement
2/7
तुम्हीही अशीच योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. या योजनांत चांगले व्याजदर मिळतात. पोस्ट ऑफिसमध्ये एक फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे. यात तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. त्यावर चांगला व्याजदर मिळतो. या योजनेत तुम्हाला 10,14,964 रुपयांचा परतावा हवा असेल तर किती गुंतवणूक करावी, ते जाणून घ्या.
advertisement
3/7
एखाद्याला पोस्ट ऑफिसच्या फिक्ड डिपॉझिट योजनेत एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीच्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर मिळतात.
advertisement
4/7
एका वर्षासाठी 6.9 टक्के आणि दोन वर्षांसाठी 7 टक्के व्याज दिले जाते. तीन वर्षांसाठी 7.01 टक्के व्याजदर मिळतो. मात्र जर तुम्ही पाच 5 वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर त्यावर तुम्हाला 7.5 टक्के व्याज मिळेल .
advertisement
5/7
तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी सात लाख रुपयांची गुंतवली केल्यास तुम्हाला त्यावर 7.5 टक्के व्याज मिळेल. या व्याजदरानुसार, तुम्ही जे सात लाख रुपये गुंतवाल त्यावर तुम्हाला 3,14,964 रुपये व्याज मिळेल.
advertisement
6/7
तसेच पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट स्कीमच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला जी एकूण रक्कम मिळेल ती 10,14,964 रुपये असेल. जर एखाद्याने पाच वर्षांसाठी पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केली, तर त्याला इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते.
advertisement
7/7
तुम्हाला जर पोस्ट ऑफिसच्या फिक्स डिपॉझिट स्कीममध्ये अकाउंट उघडायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावे लागेल. अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम गुंतवायची आहे ती एकाच वेळी जमा करावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
5 वर्ष पैसे गुंतवून कसे मिळवायचे 10,14,964, Post office ची सीक्रेट स्कीम तुम्हाला माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल