Success Story : कामाचा मिळत नव्हता योग्य मोबदला, तरुणानं सुरू केलं अप्पे सेंटर, कमाई तर पाहाच
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
प्रतीकने कंपनीत काम केलं. पण कामाचा मोबदला योग्य मिळत नसल्याने प्रतीकने काम सोडायचा निर्णय घेतला आणि सोलापुरात परत येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/5

नोकरी करत असताना पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसल्याने अधिकाधिक तरुण नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. असाच व्यवसाय सोलापूर शहरातील होटगी रोड येथे राहणाऱ्या प्रतीक मुलगे यांनी मुंबईतील एका खाजगी कंपनीतील जॉब सोडून सोलापुरात परत येऊन गुरुनानक चौकात सदगुरु अप्पे सेंटर सुरू केलं आहे. तर या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून महिन्याला 45 हजार रुपयाची कमाई करत आहेत.
advertisement
2/5
प्रतीक सोमनाथ मुलगे राहणार होटगी रोड सोलापूर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन हा कोर्स केला. त्यानंतर नोकरीच्या शोधात मुंबई येथे गेले.
advertisement
3/5
मुंबई येथील एका खाजगी कंपनीत प्रतीक यांना काम मिळालं. काही दिवस प्रतीकने कंपनीत काम केलं. पण कामाचा मोबदला योग्य मिळत नसल्याने प्रतीकने काम सोडायचा निर्णय घेतला आणि सोलापुरात परत येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/5
मागील चार वर्षापासून सदगुरु अप्पे सेंटर या नावाने सोलापुरातील गुरुनानक चौकात प्रतीकने नाष्टा सेंटर सुरू केला आहे. नाश्ता सेंटर सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवस ते खाण्यासाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. पण आता याच सदगुरु अप्पे सेंटरवर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज 140 ते 150 प्लेट्स अप्पेची विक्री आज प्रतीक करत आहेत. तर सर्व खर्च वजा करून दिवसाला 1300 ते 1500 रुपयांची कमाई प्रतीक मुळगे करत आहेत. तर महिन्याला 45 हजार रुपये आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांची कमाई प्रतीक मुलगे करत आहेत.
advertisement
5/5
प्रतीक यांच्या सदगुरू अप्पे नाष्टा सेंटरमध्ये साधे अप्पे 30 रुपये, मसाला अप्पे 45 रुपये, तुपातले अप्पे 60 रुपये, चीज अप्पे 60 रुपये, इडली सांबर 30 रुपये एक प्लेट दर आहे. सकाळच्या वेळेस शाळकरी मुलांना डबे नाश्ता म्हणून अप्पे घेऊन जाण्यासाठी पाल्यांची गर्दी असते. तसेच उत्कृष्ट आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले अप्पे खाण्यासाठी नागरिकांची गर्दी नेहमीच असते. नोकरी करून समोरच्याला मोठे करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतः मोठा व्हावं असा सल्ला नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : कामाचा मिळत नव्हता योग्य मोबदला, तरुणानं सुरू केलं अप्पे सेंटर, कमाई तर पाहाच