आयुर्वेदाच्या ज्ञानाचा केला वापर, महिलेनं सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला कोटींची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
केवळ व्यवसाय नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्याचा त्यांचा उद्देश असून सप्तमवेद नावाने हा स्टार्टअप सुरू केला आहे.
advertisement
1/7

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील ऋषिका दिघे या महिलेनं आयुर्वेदाच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून स्वतःचं यशस्वी स्टार्टअप उभारलं आहे. त्यांच्या आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सना बाजारात चांगली मागणी असून, आज त्या चांगली कमाई करत आहेत. केवळ व्यवसाय नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्याचा त्यांचा उद्देश असून सप्तमवेद नावाने हा स्टार्टअप सुरू केला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड येथील ऋषिका दिघे या महिलेने 2020 साली आयुर्वेदिक सप्लिमेंट्सचे 50 हून अधिक प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार करून सप्तमवेद नावाने कंपनी ते चालवतात. या व्यवसायाच्या माध्यमातून 13 कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल ही करतात.
advertisement
3/7
'मी पत्रकारिता करत असताना आदिवासी भागातील लोकांना पाहिलं की ते हॉस्पिटल ला न जाता जडीबुटी आहेत त्याच्या माध्यमातून ते आपला आजार बरा करतात. 2020 मध्ये कोरोना काळात काय करायचं? असा प्रश्न निर्माण झाला.
advertisement
4/7
त्यामुळे ठरवलं की आपण आयुर्वेदिक सप्लिमेंटचा व्यवसाय सुरू करावा. तीन प्रॉडक्ट्स घेऊन ही सुरुवात केली होती.
advertisement
5/7
आज जवळपास 50 हून अधिक प्रॉडक्ट्स हे तयार केले आहेत. यामध्ये मोरिंगा पावडर, बीटरूट पावडर, व्हीटग्रास असे पावडर आणि काही टॅब्लेट्सच्या स्वरूपात पहिला मिळतात', असं ऋषिका दिघे सांगतात.
advertisement
6/7
'जवळपास 20 लोक कामाला असून त्यामध्ये 15 महिला काम करतात. या प्रॉडक्ट्सची किंमत साधारण 299 पासून ते 1500 रुपये पर्यंत आहेत जे सर्वांना परवडतील. जेव्हा घरातून सुरुवात केली तेव्हा 50 किलो पावडर ही तयार केली होती.
advertisement
7/7
आज हीच 16 टन पर्यंत जाऊन पोहोचली आहे. भारतासह परदेशात देखील याची विक्री ही केली जाते. या माध्यमातून वार्षिक उलाढाल ही 13 कोटी रुपये ही होत आहे', अशी माहिती व्यवसायिका ऋषिका दिघे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
आयुर्वेदाच्या ज्ञानाचा केला वापर, महिलेनं सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला कोटींची उलाढाल