ATM मधून कॅश काढणं महागलं! मोठ्या बँकेने वाढवले चार्जेस, यात तुमचं अकाउंट आहे?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि नेहमीच दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून कॅश काढत असाल. तर आता तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त खर्च करण्यासाठी तयार राहावे लागेल.
advertisement
1/7

SBI ATM Charges Increase: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात आणि नेहमीच दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून कॅश काढत असाल तर तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त पैसे खर्च करण्यासाठी तयार राहावे लागेल. देशाथील सर्वात मोठी सरकारी बँकेने नॉन एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे.ज्यामुळे वारंवार एटीएमचा वापर करणाऱ्यांच्या खिशावर थेट परिणाम होईल. चला जाणून घेऊया तुमच्या खिशावर किती परिणाम होईल.
advertisement
2/7
एसबीआयने दिली माहिती : बँकेच्या म्हणण्यानुसार, एटीएम आणि ऑटोमेटेड डिपॉझिट-कम-विथड्रॉल मशीनवर आकारले जाणारे इंटरचेंज फी वाढली आहे, ज्यामुळे बँकेने या सर्व्हिसाठी चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचेंज फी म्हणजे एटीएम वापरासाठी एका बँकेने दुसऱ्या बँकेला दिलेली रक्कम.
advertisement
3/7
सॅलरी अकाउंट धारकांसाठी बदललेले नियम : एसबीआयने सॅलरी अकाउंट ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, सॅलरी अकाउंटधारकांना नॉन-एसबीआय एटीएमवर अनलिमिटेड फ्री ट्रांझेक्शनची सुविधा बंद करण्यात आली आहे.
advertisement
4/7
नवीन व्यवस्थेनुसा, सॅलरी अकाउंटधारक महिन्यात एकूण 10 वेळाच ट्रांझेक्शन करु शकतात. ज्यामध्ये कॅश काढणे आणि बॅलेन्सची माहिती मिळवणे दोन्हींचा समावेश आहे. ठरलेल्या वेळेनंतर ट्रांझेक्शनवर बँकेद्वारे चार्ज द्यावा लागेल.
advertisement
5/7
सेव्हिग अकाउंट असणाऱ्यांसाठी कोणता बदल झाला? : बँकेने बचत खातेधारकांसाठी फ्री ट्रांझेक्शनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणेच, ते SBI नसलेल्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करू शकतील. तसंच, या वेळेनंतर एटीएम वापरण्यासाठी शुल्क आकारले जाईल. बँकेने शुल्कात सुधारणा केली आहे.
advertisement
6/7
5 वेळा रक्कम काढण्याची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, रोख रक्कम काढण्यासाठी ₹23 + GST लागेल. पूर्वी हा चार्ज ₹21 होता. तसंच, बॅलन्स चेक किंवा मिनी स्टेटमेंटसाठी आता ₹11 + GST लागतील.
advertisement
7/7
या ग्राहकांना दिलासा : बँकेने बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट असलेल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. या ग्राहकांसाठी जुने नियम लागू राहतील. नवीन प्रणाली अंतर्गत या खातेधारकांसाठी कोणतेही नवीन शुल्क आकारले जाणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
ATM मधून कॅश काढणं महागलं! मोठ्या बँकेने वाढवले चार्जेस, यात तुमचं अकाउंट आहे?