TRENDING:

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

Last Updated:
शुभमन गिलने मुंबईतील जुहू परिसरात आलिशान अपार्टमेंट खरेदी करत मोठी गुंतवणूक केली आहे.भारतीय क्रिकेटपटूंमध्ये याआधी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जहीर खान यांसारख्या क्रिकेटपटूंनीही मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती.
advertisement
1/9
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याने मुंबईतील जुहू या पॉश भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. ही अपार्टमेंट पूजा लीजर अँड लाइफस्टाइल कंपनीकडून खरेदी करण्यात आले असून या प्रकल्पात अभिनेता जॅकी भगनानी आणि त्यांचे वडील वाशु भगनानी भागीदार आहेत.
advertisement
2/9
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून ऑगस्ट 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गिलचा फ्लॅट 3,369 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा फ्लॅट जुहू-तारा रोडवर 12व्या मजल्यावर आहे.
advertisement
3/9
महाराष्ट्र रेरा पोर्टलनुसार संबंधित इमारत 19 मजली असणार असून त्यात बेसमेंट आणि पोडियम पार्किंगची सुविधा असेल. संपूर्ण प्रकल्पात केवळ 14 अपार्टमेंट्स बांधले जाणार आहेत. यामध्ये 1 बीएचके, 2 बीएचके, 4 बीएचके तसेच डुप्लेक्स अशा विविध प्रकारच्या घरांचा समावेश आहे.
advertisement
4/9
जुहू येथील फ्लॅटच्या व्यवहारासाठी त्याने सुमारे 1.24 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपयांची नोंदणी फी भरली आहे. गिलच्या या फ्लॅटची किंमत सुमारे 20.7 कोटी रुपये आहे.
advertisement
5/9
दरम्यान गिलचे पंजाबमधील फाजिल्का येथेही एक आलिशान घर असून त्याची किंमत सुमारे 3.2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या घरात आधुनिक सुविधा आणि पारंपरिक पंजाबी शैलीचा संगम दिसून येतो.
advertisement
6/9
शुभमन गिलव्यतिरिक्त भारतीय क्रिकेटमधील इतर खेळाडूंनीही अलीकडे मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जहीर खान यांच्या कुटुंबीयांनी मिळून मागील काही महिन्यांत सुमारे 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
7/9
भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्यांची पत्नी देविशा यांनी देवनारमधील ‘गोदरेज स्काय टेरेस’मध्ये 7.18 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. यापूर्वी मार्च 2025 मध्ये त्यांनी याच प्रकल्पात 21 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट घेतले होते.
advertisement
8/9
दरम्यान माजी कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह यांनी प्रभादेवी येथील ‘आहूजा टावर्स’मध्ये 26.30 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या फ्लॅटमध्ये तीन गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा आहे.
advertisement
9/9
तसेच माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि त्यांची पत्नी सागरिका घाटगे यांनी 2025 मध्ये एल्फिन्स्टन रोड येथील ‘इंडियाबुल्स स्काय’ प्रकल्पात सुमारे 11 कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला आहे. मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये क्रिकेटपटूंची वाढती गुंतवणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल