नाणं जितकं छोटं, अर्थव्यवस्थेचा संकेत तितकाच मोठा; तुमच्या खिशातील नाणं सांगतं देशाच्या इकोनॉमीची परिस्थिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही कॉइन्स कलेक्टर असताता ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे किंवा एका विशिष्ट पद्धतेची नाणी जमा करायला आवडतात. त्यामुळे असे लोक तुम्हाला त्या नाण्यांच्या बदल्यात खूप मोठी रक्कम देऊ शकतात.
advertisement
1/10

तुमच्या ही घरात कुठेतरी जुन्या नाण्यांचा डब्बा किंवा पोटली पडलेली असेल. अनेकांना हे आता बिनकामाचं वाटतं किंवा अगदी भांगार वाटतं. पण त्यात कधीकधी ट्रेंजर लपलेलं असतं. ज्याची किंमत तुम्हाला त्या नाण्याच्या तुलनेत कितीतरी जास्त पटीने मिळू शकते. काही कॉइन्स कलेक्टर असताता ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे किंवा एका विशिष्ट पद्धतेची नाणी जमा करायला आवडतात. त्यामुळे असे लोक तुम्हाला त्या नाण्यांच्या बदल्यात खूप मोठी रक्कम देऊ शकतात.
advertisement
2/10
1957 पासून आजपर्यंत भारतीय चलनात इतके बदल झाले की एकेक करून लहान नाणी व्यवहारातूनच अदृश्य झाली. हा बदल फक्त नाण्यांपुरता नाही; तो अर्थव्यवस्थेचा, महागाईचा आणि लोकांच्या खरेदी क्षमतेचा आरसा आहे. आधी १० पैसे, २५ पैसे सुरु होते. त्यात खूप काही यायचं पण आज १ रुपयाला देखील फारशी किंमत उरली नाही. कारण त्या १ रुपयात साधं चॉटलेट सोडलं तर क्वचितच दुसरं काही मिळत असेल.
advertisement
3/10
या काळात 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे आणि 5 पैशांची खूप किंमत होती. या छोट्या नाण्यांमध्ये कुल्फी, चहा, बसचं तिकीट अशी अनेक छोटी-मोठी कामं सहज होत. महागाई कमी असल्यामुळे प्रत्येक नाण्याचं मोल नागरिकांच्या व्यवहारात स्पष्टपणे दिसत होतं.
advertisement
4/10
महागाई वाढू लागली आणि सर्वप्रथम सर्वात लहान नाणी वापरातून गायब झाली. 1 पैसा आणि 2 पैसा यांचं आर्थिक मूल्य इतकं कमी झालं की लोक त्यांना स्वीकारायलाही तयार नव्हते. हळूहळू या नाण्यांचा प्रसार कमी होत गेला आणि ती ‘चलनाबाहेर’ झाली.
advertisement
5/10
2000-2011: एकेक करून नाण्यांचा अंतया दशकात बदल सगळ्यांत वेगाने झाला. 5 पैसा, 10 पैसा, 20 पैसा, 25 पैसा ही सर्व नाणी हळूहळू बंद करण्यात आली. शेवटी 2011 मध्ये सरकारने स्पष्ट जाहीर केलं की 50 पैशांखालील कोणतेही नाणे चलनात राहणार नाही. महागाईने सर्व लहान नाण्यांना इतिहास जमा केलं.
advertisement
6/10
पूर्वीची नाणी जड, मोठी आणि दर्जेदार धातूची बनवली जात. उदाहरणार्थ, 1970 मध्ये असलेलं 10 पैशाचं नाणं आजच्या 10 रुपयांच्या नाण्यापेक्षा मोठं होतं. परंतु नंतर धातू महागल्याने नाणी लहान, हलकी आणि स्वस्त धातूची बनवली जाऊ लागली.
advertisement
7/10
2025: 1 आणि 2 रुपयांचं नाणंदेखील ‘बंद’ होण्याच्या उंबरठ्यावरआजच्या काळात अनेक ठिकाणी लोक थेट सांगतात. “1–2 रुपयाचं नाणं नको, सरळ UPI करा.” दुकानदार, भाजीवाले किंवा ऑटोचालक लहान नाणी स्वीकारत नाहीत. यामुळे 1 आणि 2 रुपयांची नाणीही व्यवहारातून नष्ट होत चालली आहेत.
advertisement
8/10
आपण ज्या नाण्यांना ‘कबाड’ म्हणतो, ती काही देशात अजूनही पूर्णपणे वापरली जातात.जपानमध्ये 1957 चं 1 येन आजही पूर्णपणे वैध आहे. स्वित्झर्लंडमध्ये 5 रॅपेन अजूनही दुकानात स्वीकारतात. डेन्मार्कमध्ये 50 ऑरे (अर्धा क्रोन ≈ 35 रुपये) आजही चलनात आहे. या देशांनी महागाई नियंत्रित ठेवल्यामुळे लहान नाणी टिकली. भारतामध्ये मात्र महागाई वाढल्याने सर्व नाणी एकामागोमाग एक नष्ट होत गेली.
advertisement
9/10
कॅशवर चालणारा मोठा वर्ग मजूर, विक्रेते, ग्रामीण भागातील लोक यांना “वरचे जास्तीचे पैसा” द्यावा लागतो. उदा. 18 रुपयांचं सामान घेतलं तर 20 रुपये द्यावे लागतात. कारण पुन्हा देण्यासाठी एक किंवा दोन रुपये उपलब्ध नसतात. ही महागाईची अप्रत्यक्ष करासारखी आर्थिक मारक पद्धत आहे, जी गरीबांसाठी जास्त त्रासदायक ठरते.
advertisement
10/10
भारतामध्ये UPI उपलब्ध असल्यामुळे7 रुपयांची चहा, 23 रुपयांची भाजी अशा बारीक रकमेचे व्यवहार सहज होऊ शकतात. UPI नसता तर लहान नाण्यांच्या कमतरतेमुळे दररोज गोंधळ, भांडणं आणि अतिरिक्त पैसे देण्याचे प्रश्न निर्माण झाले असते. शिवाय सुट्टे नाही म्हणून चॉकलेट देण्याची पद्धत देखील आता फार कमी झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
नाणं जितकं छोटं, अर्थव्यवस्थेचा संकेत तितकाच मोठा; तुमच्या खिशातील नाणं सांगतं देशाच्या इकोनॉमीची परिस्थिती