TRENDING:

Business Story : तुम्हाला माहितीही नसेल हा बिझनेस, सोलापूरचा तरुण करतोय लाखात कमाई!

Last Updated:
अभिषेक सतीश रंपुरे हा तरुण गेल्या पाच वर्षांपासून हिरे नवरत्न परीक्षण करून प्रमाणात ग्राहकांना देण्याचं काम करत आहे. तर या व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल तो करत आहे.
advertisement
1/7
तुम्हाला माहितीही नसेल हा बिझनेस, सोलापूरचा तरुण करतोय लाखात कमाई!
सध्याच्या घडीला अनेक उच्चशिक्षित तरुण उद्योग व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. असाच अनोखा व्यवसाय सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठ सराफ बाजार येथे सूरू केला आहे.
advertisement
2/7
अभिषेक सतीश रंपुरे हा तरुण गेल्या पाच वर्षांपासून हिरे नवरत्न परीक्षण करून प्रमाणात ग्राहकांना देण्याचं काम करत आहे. तर या व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल तो करत आहे. या व्यवसाय संदर्भात अधिक माहिती अभिषेक रपुरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
3/7
अभिषेक सतीश रंपुरे राहणार सिद्धेश्वर पेठ हा गेल्या पाच वर्षांपासून पूर्व मंगळवार पेठेत सिद्ध जेम्स या नावाने लॅब चालवत आहे. या जेम्स लॅबमध्ये अभिषेक हिरे, नवरत्न परीक्षण करून अधिकृत प्रमाणपत्र देण्याचं काम करत आहे. हिरे आणि नवरत्न परीक्षण करण्याचे शिक्षण त्याचे सुरत येथील इंडियन डायमंड इन्स्टिट्यूट येथे झाले आहे.
advertisement
4/7
12 वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर अभिषेक याने ठरवलं की वेगळा काहीतरी व्यवसाय करावा. मग त्याने इंडियन डायमंड इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन प्रोफेशनल डायमंड रीडर आणि जिमोलोजिस्ट यांचे प्रशिक्षण घेतले.
advertisement
5/7
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अभिषेक याने 6 ते 7 वर्षं वेगवेगळ्या नामांकित ज्वेलरी शॉपमध्ये काम करून अनुभव घेतला. त्यानंतर त्याने सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठ सराफ बाजार येथे स्वतःचा सिद्ध जेम्स लॅब व ज्वेलर्स या नावाने व्यवसाय सुरू केला.
advertisement
6/7
अभिषेक रंपुरे याच्याकडे हिरे व नवरत्न परीक्षण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, गुलबर्गा, लातूर, विजापूर येथून ग्राहक व व्यापारी येतात.
advertisement
7/7
हिरे व नवरत्न परीक्षण करून घेऊन जातात. हिरे,नवरत्न यांच्या आकारावर परीक्षणचे दर ठरवले जातात. तर हिरे नवरत्न परीक्षण करून अभिषेक सतीश रंपुरे हा महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Business Story : तुम्हाला माहितीही नसेल हा बिझनेस, सोलापूरचा तरुण करतोय लाखात कमाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल