TRENDING:

आज ट्रेलर होता, उद्या त्यापेक्षा डेंजर; शेअर बाजारात उद्या 'ब्लॅक वेनेस्डे'ची तयारी; गुंतवणूकदारांचे Heartbeat वाढले

Last Updated:
Stocks to Watch: मंगळवारच्या सत्रात शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली असून निफ्टी 350 हून अधिक अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
advertisement
1/12
शेअर बाजारात उद्या 'ब्लॅक वेनेस्डे'ची तयारी; गुंतवणूकदारांचे Heartbeat वाढले
मंगळवारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळाली असून, निफ्टी 350 हून अधिक अंकांनी कोसळून बंद झाला. या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून आता सर्वांचे लक्ष बुधवारच्या सत्राकडे लागले आहे. पुढील व्यवहारात प्रमुख निर्देशांकांची दिशा काय राहते आणि काही निवडक शेअर्समध्ये हालचाल कशी होते, याकडे बाजाराचे बारकाईने लक्ष असणार आहे. मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या तिसऱ्या तिमाहीचे (Q3) आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये पर्सिस्टंट सिस्टिम्स, एयू स्मॉल फायनान्स बँक, डीसीएम श्रीराम, विक्रम सोलर, इंडियामार्ट, सायंट डीएलएम, जम्मू अँड काश्मीर बँक यांच्यासह इतर काही कंपन्यांचा समावेश आहे.
advertisement
2/12
पर्सिस्टंट सिस्टिम्स पर्सिस्टंट सिस्टिम्सचा तिसऱ्या तिमाहीतील शुद्ध नफा तिमाही आधारावर (QoQ) 6.7 टक्क्यांनी घटून 439.4 कोटी रुपयांवर आला आहे. मागील तिमाहीत कंपनीचा नफा 471 कोटी रुपये होता. मात्र, महसुलात 5.5 टक्क्यांची वाढ झाली असून तो 3,778.2 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. EBIT मध्ये 7 टक्क्यांची घट नोंदवली गेली असून तो 583 कोटी रुपयांवरून 542.7 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचा मार्जिनही 16.3 टक्क्यांवरून घटून 14.4 टक्के झाला आहे. दरम्यान डॉलरमधील उत्पन्नात 4 टक्क्यांची वाढ झाली असून ते 422.5 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचले आहे, जे मागील तिमाहीत 406.2 दशलक्ष डॉलर होते.
advertisement
3/12
एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँकेचा तिसऱ्या तिमाहीतील नफा वार्षिक आधारावर (YoY) 26.3 टक्क्यांनी वाढून 667.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेचा नफा 528 कोटी रुपये होता. नेट इंटरेस्ट इनकम (NII) मध्येही 15.8 टक्क्यांची वाढ झाली असून ती 2,341.3 कोटी रुपये इतकी आहे. अ‍ॅसेट क्वालिटीच्या आघाडीवर सुधारणा दिसून आली असून ग्रॉस एनपीए 2.41 टक्क्यांवरून घटून 2.30 टक्के झाला आहे, तर नेट एनपीए तिमाही आधारावर 0.88 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे.
advertisement
4/12
डीसीएम श्रीराम डीसीएम श्रीरामचा शुद्ध नफा वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी घटून 212 कोटी रुपये झाला आहे. मात्र, कंपनीचा महसूल 13.8 टक्क्यांनी वाढून 4,003 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. EBITDA मध्ये 7.1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून तो 496.3 कोटी रुपयांवरून 531.5 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. तरीही मार्जिनमध्ये घसरण झाली असून ते 14.1 टक्क्यांवरून 13.3 टक्के झाले आहे.
advertisement
5/12
विक्रम सोलर विक्रम सोलरने तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 19 कोटी रुपयांवरून थेट 98 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महसूल 1,026 कोटी रुपयांवरून वाढून 1,106 कोटी रुपये झाला आहे. EBITDA मध्ये मोठी उसळी दिसून आली असून तो 85 कोटी रुपयांवरून वाढून 205 कोटी रुपये झाला आहे. मार्जिनही 8.2 टक्क्यांवरून सुधारत 18.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, लेबर कोडमुळे कंपनीच्या निकालांवर 56 कोटी रुपयांचा नकारात्मक परिणाम झाला आहे.
advertisement
6/12
इंडियामार्ट इंडियामार्टचा शुद्ध नफा वार्षिक आधारावर 55.6 टक्क्यांनी वाढून 188.3 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा 121 कोटी रुपये होता. महसूल 13.4 टक्क्यांनी वाढून 401.6 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षी 354.3 कोटी रुपये होता. मात्र EBITDA मध्ये 2.9 टक्क्यांची घट झाली असून तो 138.5 कोटी रुपयांवरून 134.5 कोटी रुपयांवर आला आहे. परिणामी मार्जिन 39.1 टक्क्यांवरून घटून 33.5 टक्के झाले आहे.
advertisement
7/12
सायंट डीएलएम (Cyient DLM) सायंट डीएलएमचा शुद्ध नफा वार्षिक आधारावर 2.7 टक्क्यांनी वाढून 11.2 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी 10.9 कोटी रुपये होता. मात्र, उत्पन्नात मोठी घट झाली असून ते 31.7 टक्क्यांनी घसरून 444.2 कोटी रुपयांवरून 303.3 कोटी रुपयांपर्यंत आले आहे. EBITDA मध्येही 3.3 टक्क्यांची घट झाली असून तो 28.2 कोटी रुपयांवरून 27.3 कोटी रुपयांवर आला आहे. तरीही मार्जिनमध्ये सुधारणा दिसून आली असून ते 6.3 टक्क्यांवरून वाढून 9 टक्के झाले आहे.
advertisement
8/12
जम्मू अँड काश्मीर बँक जम्मू अँड काश्मीर बँकेचा शुद्ध नफा वार्षिक आधारावर 10.7 टक्क्यांनी वाढून 588 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, शुद्ध व्याज उत्पन्नात (NII) 1.3 टक्क्यांची किरकोळ घट झाली असून ते 1,509 कोटी रुपयांवरून 1,489 कोटी रुपयांवर आले आहे. अ‍ॅसेट क्वालिटीमध्ये सुधारणा कायम असून ग्रॉस एनपीए 3.32 टक्क्यांवरून घटून 3 टक्के झाला आहे, तर नेट एनपीए 0.76 टक्क्यांवरून कमी होऊन 0.68 टक्के झाला आहे.
advertisement
9/12
क्रेडिटअ‍ॅक्सेस ग्रामीन क्रेडिटअ‍ॅक्सेस ग्रामीनने तिसऱ्या तिमाहीत मोठा सुधारणा दर्शवली आहे. कंपनीने 252 कोटी रुपयांचा शुद्ध नफा नोंदवला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 100 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. नेट इंटरेस्ट इनकम वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढून 976 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी 863 कोटी रुपये होती.
advertisement
10/12
सुप्रीम पेट्रोकेम सुप्रीम पेट्रोकेमचा शुद्ध नफा वार्षिक आधारावर तब्बल 80 टक्क्यांनी घटून 30.6 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचे उत्पन्नही 66 टक्क्यांनी घसरून 1,280.9 कोटी रुपये झाले आहे; जे मागील वर्षी 3,800 कोटी रुपये होते. EBITDA मध्ये 70 टक्क्यांची घसरण झाली असून तो 340 कोटी रुपयांवरून 102 कोटी रुपयांवर आला आहे. मार्जिनमध्येही थोडी कमजोरी दिसून आली असून ते 8.9 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. लेबर कोडमुळे कंपनीच्या कन्सोलिडेटेड निकालांवर 70 कोटी रुपयांचा परिणाम झाला असून हा शेअर 5 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
advertisement
11/12
शॉपर्स स्टॉप शॉपर्स स्टॉपचा शुद्ध नफा वार्षिक आधारावर 69 टक्क्यांनी घटून 16.1 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा 52.2 कोटी रुपये होता. मात्र, महसूल 2.6 टक्क्यांनी वाढून 1,415 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी 1,379 कोटी रुपये होता. EBITDA मध्ये 11.1 टक्क्यांची घट झाली असून तो 245 कोटी रुपयांवरून 217.8 कोटी रुपयांवर आला आहे. परिणामी मार्जिन 17.7 टक्क्यांवरून घटून 15.4 टक्के झाले आहे.
advertisement
12/12
दरम्यान हायवे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एनएचएआयकडून 64.68 कोटी रुपयांचा महत्त्वाचा कंत्राट मिळाला आहे. <strong>Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ&#x200d;ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
आज ट्रेलर होता, उद्या त्यापेक्षा डेंजर; शेअर बाजारात उद्या 'ब्लॅक वेनेस्डे'ची तयारी; गुंतवणूकदारांचे Heartbeat वाढले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल