Success Story : अपघात झाला पण खचला नाही 21 वर्षांचा सुजय, उभारली 2 कोटींची कंपनी!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अपघातामध्ये हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. तरीही सुजय यांनी हार न मानता 2 कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभारली आहे. त्याचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच आहे.
advertisement
1/5

पुण्यातील सुजय पाचंगे यांचा वयाच्या अवघ्या 21 वर्षी झालेल्या अपघातामध्ये हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. तरीही सुजय यांनी हार न मानता 2 कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभारली आहे. त्याचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच आहे.
advertisement
2/5
सुजय पाचंगे यांचं इंजिनियरिंगच शिक्षण चालू असताना हा भयंकर अपघात झाला होता.अपघातानंतर जवळपास 4 ते 5 वर्ष एकाच जागीवर बसून होते. हात - पायांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी त्यांना व्हीलचेअरचाही आधार घ्यावा लागला आहे. या दरम्यान 2 ते 3 वर्ष त्यांनी डिप्रेशनचा देखील सामना केला.
advertisement
3/5
परंतु हार न मानता वडिलांकडून प्रेरणा घेत त्यांनी शेती संबंधित पोशिंदा नावाने कंपनी स्थापन केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 2 कोटींवर पोहोचला आहे.
advertisement
4/5
2022 साली सुजय पाचंगे यांनी पोशिंदा ही शेतीशी संबंधित कंपनी उभारली. पोशिंदा कंपनीत ऑर्गॅनिक वेस्टपासून सेंद्रिय खत तयार केलं जातं.
advertisement
5/5
त्यांनी बनवलेल्या या खतामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांच्या या पोशिंदा स्टार्टअपला अनेक अवॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : अपघात झाला पण खचला नाही 21 वर्षांचा सुजय, उभारली 2 कोटींची कंपनी!