Virat Anushka : शेअर मार्केटवाल्यांनो, विराट-अनुष्काची आयडिया एक नंबर, कमावले 9 कोटी!
- Published by:Shreyas Deshpande
- trending desk
Last Updated:
अनेकदा गुंतवणूकदार संधी पाहूनच चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. स्टार भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही चार वर्षांपूर्वी एका कंपनीत खूप विचारपूर्वक गुंतवणूक केली होती. तीच कंपनी आता आयपीओ घेऊन येत आहे.
advertisement
1/8

खास गोष्ट म्हणजे कंपनी ज्या किमतीवर आयपीओ लाँच करत आहे, त्या किमतीपेक्षा खूप कमी किमतीत विराट आणि अनुष्काने गुंतवणूक केली होती. आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना जवळपास चार वर्षांपूर्वी गो डिजिट जनरल इन्शुरन्समध्ये केलेल्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/8
कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (RHP) या सेलिब्रिटी जोडप्याने फेब्रुवारी 2020 मध्ये गो डिजिटमध्ये गुंतवणूक केली होती.
advertisement
3/8
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये गो डिजिट जनरल इन्शुरन्सचे शेअर्स 75 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले होते. विराट कोहलीने 2 कोटी रुपयांचे 2,66,667 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते, तर अनुष्का शर्माने 50 लाख रुपयांना 66,667 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. अशा प्रकारे पती-पत्नी दोघांनी मिळून अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
advertisement
4/8
आता गो डिजिट 15 मे रोजी त्याचा आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. या आयपीओचा प्राइस बँड 258 रुपये ते 272 रुपये प्रति शेअरदरम्यान सेट केला आहे. अशा परिस्थितीत, विराट आणि अनुष्काला इश्यूच्या प्राइसमधून 262% रिटर्न मिळू शकतो.
advertisement
5/8
आयपीओच्या किमतीवरून विराट आणि अनुष्काने गुंतवणूक केलेल्या शेअर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यास 272 रुपयांच्या अप्पर बँडनुसार विराट कोहलीच्या 2,66,667 शेअर्सची किंमत 7.25 कोटी रुपये होते, तर अनुष्का शर्माच्या 66,667 शेअर्सची व्हॅल्यू 1.81 कोटी रुपये आहे.
advertisement
6/8
एकूण दोघांची गुंतवणूक 2.5 कोटी रुपये होती, त्याची आताची व्हॅल्यू 9.07 कोटी रुपये झाली आहे. शेअर्सच्या किमतीत वाढ झाली असली तरी हे जोडपं आयपीओमधले कोणतेही शेअर्स विकत नाही.
advertisement
7/8
जनरल इन्शुरन्स कंपनी गो डिजिटल जनरल इन्शुरन्स लिमिटेडने शुक्रवारी आपल्या 2,651 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्राइस बँड 258 रुपये ते 272 प्रति शेअर ठरवला आहे.
advertisement
8/8
कर्नाटकच्या फेअरफॅक्स ग्रुपचं पाठबळ असलेल्या या कंपनीने म्हटलंय, की आयपीओ 15 मे रोजी उघडेल आणि त्यासाठी 17 मेपर्यंत अर्ज करता येतील. तसंच 14 मे रोजी मोठ्या म्हणजेच अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ खुला होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Virat Anushka : शेअर मार्केटवाल्यांनो, विराट-अनुष्काची आयडिया एक नंबर, कमावले 9 कोटी!