कोणत्या वयात घ्यायला हवा मेडिक्लेम, तुम्ही तर ही चूक करत नाही?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लहान वयात हेल्थ इन्शुरन्स घेणे फायदेशीर ठरते. कमी प्रीमियम, उत्तम कव्हरेज आणि पूर्वीच्या आजारांचे संरक्षण मिळते. २१ वर्षांचे असताना आर्थिक क्षमता असल्यास त्वरित विमा घ्यावा.
advertisement
1/6

हेल्थ इन्शुरन्ससाठी लवकरची घेतलेला विमा अधिक फायद्याचा ठरतो. जसे गुंतवणूक लवकर सुरू केल्यास वाढीचा फायदा मिळतो, तसेच आरोग्य विमाही लवकर घेतल्यास प्रीमियम कमी आणि कव्हरेज अधिक मिळते.
advertisement
2/6
कमी प्रीमियम: हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम वाढत्या वयासोबत वाढतात. जर तुमचे वय कमी असेल आणि वैद्यकीय इतिहास स्वच्छ असेल, तर प्रीमियमही कमी राहतो. वाढत्या वयात आजार वाढतात, त्यामुळे प्रीमियम महाग होतो.
advertisement
3/6
उत्तम कव्हरेज: कमी वयात विमा घेतल्यास विमा कंपन्या अधिक कव्हरेज ऑफर करतात. कारण युवा वयोगटातील ग्राहकांकडून क्लेम कमी येतात.
advertisement
4/6
पूर्वीच्या आजारांचे संरक्षण: जर तुम्हाला आधीपासून एखादा आजार असेल, तर विमा कंपन्या २-३ वर्षांचा वेटिंग पिरियड ठरवतात. त्यामुळे विमा लवकर घेतल्यास हा कालावधी कमी होतो आणि कव्हरेज लवकर मिळते.
advertisement
5/6
जर तुम्ही २१ वर्षांचे असाल आणि विमा घेण्याची आर्थिक क्षमता असेल, तर हेल्थ इन्शुरन्स लवकरच घ्यावा. यामुळे भविष्यातील आरोग्यविषयक आर्थिक जोखीम कमी करता येते.
advertisement
6/6
लहान वयात आरोग्य विमा घेणे म्हणजे सध्याच्या आणि भविष्यातील खर्चाची योग्य तरतूद करणे. वेळ न दवडता त्वरित योग्य हेल्थ इन्शुरन्स निवडून भविष्य सुरक्षित करा! कोणत्या कंपनीचा घ्यायचा हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किंवा अभ्यास करुन पैसे गुंतवा, नाहीतर नुकसानही होऊ शकतं.