TRENDING:

Money : भारतात पहिला ATM कुठे सुरू झाला? आणि तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय होती?

Last Updated:
जेव्हा बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे, विड्रॉल स्लिप भरावी लागायची आणि बँकेच्या वेळेतच पैसे मिळायचे. या सर्व कटकटीतून भारतीयांची सुटका करणाऱ्या 'ATM' या जादूच्या पेटीचा भारतातला प्रवास मोठा रंजक आहे.
advertisement
1/9
Money: भारतात पहिला ATM कुठे सुरू झाला? आणि तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय होती?
भारतात आज गल्लीबोळांत आणि अगदी खेडेगावातही ATM मशीन पाहायला मिळतात. खिशात पैसे नसले की "जवळपास ATM आहे का?" हा प्रश्न आपण सहज विचारतो. पण, एका काळ असा होता जेव्हा बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे, विड्रॉल स्लिप भरावी लागायची आणि बँकेच्या वेळेतच पैसे मिळायचे. या सर्व कटकटीतून भारतीयांची सुटका करणाऱ्या 'ATM' या जादूच्या पेटीचा भारतातला प्रवास मोठा रंजक आहे.
advertisement
2/9
भारतात पहिलं ATM कुठे सुरू झालं आणि तेव्हा नक्की काय घडलं होतं? जाणून घेऊया या लेखात.
advertisement
3/9
भारतात पहिले ATM कुठे आणि कधी सुरू झाले?भारतातलं पहिलं ATM 1987 मध्ये सुरू झालं. हे मशीन मुंबईतील अंधेरी भागात HSBC (Hongkong and Shanghai Banking Corporation) बँकेने लावले होते. विशेष म्हणजे, ज्या वेळी हे मशीन बसवण्यात आले, तेव्हा भारतात इंटरनेटची सोय आजच्यासारखी नव्हती आणि संगणकीकरणही प्राथमिक अवस्थेत होतं.
advertisement
4/9
लोकांची सुरुवातीची प्रतिक्रिया कशी होती?जेव्हा पहिलं ATM मुंबईत आलं, तेव्हा लोकांमध्ये कुतूहल आणि थोडी भीती अशा दोन्ही भावना होत्या:लोकांच्या नजरेत ही एक 'जादूची पेटी' होती. बँकेत न जाता, कोणाशीही न बोलता भिंतीतून पैसे बाहेर येतात, हे पाहून अनेक लोक थक्क व्हायचे.सुरुवातीला अनेकांना वाटलं की जर मशीनने चुकून जास्त पैसे कापले किंवा पैसे दिलेच नाहीत तर तक्रार कोणाकडे करायची? लोकांचा मशीनपेक्षा बँकेतील माणसांवर जास्त विश्वास होता.
advertisement
5/9
मुंबईत हे मशीन पाहण्यासाठी आणि वापरण्यासाठी लोकांच्या रांगा लागायच्या. ज्यांच्याकडे HSBC बँकेचे कार्ड होते, ते लोक स्वतःला खूप 'आधुनिक' समजायचे.
advertisement
6/9
कार्ड मशीनमध्ये अडकेल का? किंवा आपला पिन (PIN) कोणाला समजला तर? अशा भीतीमुळे सुरुवातीला फक्त उच्चभ्रू आणि तांत्रिक माहिती असलेले लोकच याचा वापर करत होते. पण हळूहळू इतर लोक देखील याचा वापर करु लागले. घाबरत सुरु केलेली गोष्ट नंतर लोकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनली.
advertisement
7/9
ATM चा शोध कोणी लावला? (एक भारतीय कनेक्शन)ATM च्या शोधामागे एक भारतीय नाव जोडलेले आहे, ते म्हणजे जॉन शेफर्ड बॅरन. त्यांचा जन्म भारतात (मेघालयची राजधानी शिलाँग येथे) झाला होता. एकदा त्यांना बँकेतून पैसे काढायला उशीर झाला आणि बँक बंद झाली. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, जर चॉकलेट काढण्यासाठी वेंडिंग मशीन असू शकते, तर पैसे काढण्यासाठी का नसावे? त्यातूनच ATM या संकल्पनेचा जन्म झाला.
advertisement
8/9
आज भारतात 2.5 लाखांहून अधिक ATM आहेत. सुरुवातीला फक्त पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे हे मशीन आता पैसे जमा करणे, चेक बुकची विनंती करणे आणि खात्याची शिल्लक तपासणे यांसारखी अनेक कामे करते.
advertisement
9/9
सुरुवातीला ATM चा पिन हा 6 अंकी ठेवला जाणार होता, पण जॉन शेफर्ड बॅरन यांच्या पत्नीला फक्त 4 अंकच लक्षात राहत होते, म्हणून त्यांनी 4 अंकी पिन ठेवण्याचा विचार केला. त्यामुळे आज जगभरात ४ अंकी पिन वापरला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Money : भारतात पहिला ATM कुठे सुरू झाला? आणि तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय होती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल