TRENDING:

दसऱ्याला सोनं खरेदी का केलं जातं, तुम्हाला माहितीय का कारण?

Last Updated:
तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आजच करा. याचं कारण म्हणजे सोन्याचे दर दसऱ्यादिवशी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
advertisement
1/7
दसऱ्याला सोनं खरेदी का केलं जातं, तुम्हाला माहितीय का कारण?
दसरा हा भारतीय सणांमधील सर्वात महत्त्वाचा सण आणि चांगला मुहूर्त मानला जातो. या सणाच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आपल्याकडे आहे. दसऱ्याला सोनं लुटा म्हणत आपट्याची पानं दिली जातात.
advertisement
2/7
दसऱ्याच्या दिवशी सोन खरेदी केलं तर ते उत्तरोत्तर वाढत जातं,ते कधीच विकायची वेळ येत नाही.असं शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे सुवर्ण,समृध्दी आणि आनंद देणारा हा सण आहे.
advertisement
3/7
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी संपूर्ण मुहूर्त आणि शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे दसऱ्याला आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. आपल्या आईला, बहिणीला किंवा बायकोला सोनं घेतलं जातं.
advertisement
4/7
तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आजच करा. याचं कारण म्हणजे सोन्याचे दर दसऱ्यादिवशी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणार असाल तर आजच करुन घ्या.
advertisement
5/7
काही ठिकाणी शनिवारी सोनं खरेदी करु नये अशीही धारणा असते. त्यामुळे बरेच जण सोनं खरेदी करण्यासाठी काचकूच करतात. आज सोन्याचे दर उतरले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे.
advertisement
6/7
आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल त्याची किंमत 70,250 रुपये होती. एकूणच कालच्या तुलनेत आज भाव कमी झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
advertisement
7/7
सोन्याचे दर गुरुवारी 76,640 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
दसऱ्याला सोनं खरेदी का केलं जातं, तुम्हाला माहितीय का कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल