तुम्ही बोगस बँकेत तर पैसे गुंतवत नाही ना? आताच चेक करा नाहीतर होईल नुकसान
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कोणतीही नवीन शाखा सुरू झाली असेल तर आधी तिथे पैसे गुंतवण्याऐवजी चौकशी करा. दुसऱ्या शाखेत जाऊन नव्या शाखेविषयी चौकशी करा. तुमची अति घाई तुम्हाला संकटात नेऊ शकते.
advertisement
1/7

मुंबई : SBI सारख्या बँकेच्या शाखेचं नाव वापरुन एका टोळीनं चक्क बनावट शाखा उघडली. इतक्यावरच थांबले नाहीत तर नोकरीचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळले. हे सगळं प्रकरण इतकं वाढलं की लोकांचे पैसे लुटण्याचा प्रकार रोजच घडू लागला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी धाड टाकून टोळीचा पर्दाफाश केला.
advertisement
2/7
या प्ररकरणी आरोपी मॅनेजर फरार असून पोलिसांनी घटनास्थळावरुन संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल ताब्यात घेतले आहेत. अख्ख्या गावातल्या लोकांना फसवलं जातं ही किती भयंकर बाबा आहे.
advertisement
3/7
धक्कादायक बाब म्हणजे जी शाखेसाठी जागा भाड्याने घेतली होती, त्या घरमालकालाही नक्की इथे काय सुरू आहे याची कोणतीही कल्पना नव्हती. त्याच्याकडे रेंट अॅग्रीमेंट नव्हतं. शब्दावर ही जागा त्या घरमालकाने भाड्याने दिली होती.
advertisement
4/7
ग्रामीण भाग असल्याने अगदी सहज फसगत होईल असा विचार करुन या टोळीनं योग्य संधी साधून लोकांना लुटलं. मात्र तुमची अशा प्रकारे लुट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
advertisement
5/7
तुम्ही ज्या बँकेत पैसे गुंतवले आहेत ती शाखा बनावट नाही ते आधी तपासून पाहा. तुमचं ज्या बँकेत खातं आहे, त्या बँकेच्या एका शाखेतून तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी अधिकृत शाखा आहेत याची लिस्ट घ्या.
advertisement
6/7
बँकेचे तिमाही निकाल तपासत राहा, प्रत्येक बँक आपले तिमाही आणि वार्षिक लेखाजोखा सादर करत असते. त्यावर लक्ष ठेवा. तिथे बँकेचा किती फायदा झाला तोटा झाला याचा संपूर्ण लेखाजोखा सांगितला जातो.
advertisement
7/7
कोणतीही नवीन शाखा सुरू झाली असेल तर आधी तिथे पैसे गुंतवण्याऐवजी चौकशी करा. दुसऱ्या शाखेत जाऊन नव्या शाखेविषयी चौकशी करा. तुमची अति घाई तुम्हाला संकटात नेऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
तुम्ही बोगस बँकेत तर पैसे गुंतवत नाही ना? आताच चेक करा नाहीतर होईल नुकसान